शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

खरसोलीमध्ये अनिल देशमुखांना धक्का, अजित पवार गटाच्या नीलिमा नरेश अडसरे विजयी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2023 11:07 AM

Nagpur gram panchayat election Result : ३५७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पाच ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूक

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, सुनील केदार, अनिल देशमुख, नितीन राऊत, आशिष देशमुख या दिगजांच्या नागपूर जिल्ह्यातील 357 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पाच ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी रविवारी मतदान झाले. 1224 मतदान केंद्रावर सरासरी 85 टक्के मतदान झाले असून या निवडणुकीचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. निकाल ऐकण्यासाठी केंद्रावर नागरिकांंची गर्दी पाहायला मिळत आहे.

कामठी तालुक्यातील बाबुळखेडा ग्रामपंचायतपदी भाजप समर्थित गटाचे कदीर इमाम छवारे विजयी झाले असून वारेगाव ग्रामपंचायत सरपंचपदी काँग्रेस समर्थित गटाच्या रत्‍नाबाई अजाबराव उईके विजयी झाल्या आहेत.

नरखेड तालुक्यात भाजपने खाते उघडले असून, मोगरा ग्राम पंचायतच्या सरपंचपदी भाजपच्या मीनाक्षी उमेश्वर मडके या विजयी झाल्या आहेत.

कुही तालुका ग्रामपंचायत निवडणूक : 1) अडम -  शालिनी गुणाकार सेलोकर भाजप, इतर 9 उमेदवार भाजपचे विजयी  2) आकोली - मंदा भीमराव पाटील काँग्रेस  सदस्यांमध्ये 7 सदस्य काँग्रेस चे विजयी 3)अंबाडी - योगेश अरुण गोरले काँग्रेस सदस्या मध्ये 7 सदस्य काँग्रेसचे विजयी पाहिल्या राउंड मध्ये विजयी सरपंच

पारशिवणी तालुक्यातील निंबा ग्राम पंचायतीत काँग्रेसच्या लिलाबाई विजय भक्ते विजयी झाल्या आहेत.

कवठा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजप समर्थित गटाचे निलेश श्रीधर डफरे विजयी तर, नेरी ग्रामपंचायत सरपंचपदी भाजप समर्थित गटाचे सुजाता सुरेश पाटील विजयी झाले आहेत.

कुही तालुका ग्रामपंचायत निवडणूक: १) नक्षी गट ग्राम पंचायतसरपंच - अनिकेत ज्ञानेश्वर वराडे (भाजप)

२) वडध ग्रामपंचायतसरपंच - गुरूदेव काळे (स्वतंञ पॅनल)

३) चिखली गट ग्रामपंचायतसरपंच - प्रणाली सतिष गारघाटे (राजू गारघाटे यांचे पॅनल)

भंडारबोडी ग्रामपंचायतमध्ये कांग्रेसच्या सुनिता रमेश मिसार सरपंचपदी विजयी. तर बोरी येथे काँग्रेसच्या प्रेमलता राजेंद्र कंगाली विजयी

खरसोलीमध्ये अनिल देशमुखांना धक्का बसला असून अजित पवार गटाच्या नीलिमा नरेश अडसरे विजयी ठरल्या आहेत.

नारसिंगी ग्राम पंचायतीत भाजपच्या नलुबाई प्रवीण काकडे विजयी

मोहदी धोत्रा येथे राष्ट्रवादीचे राजेंद्र नाखले विजयी

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकnagpurनागपूरkatol-acकाटोल