Nagpur: बंजारा समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण द्या, गोरसिकवाडी संघटनेची मागणी
By दयानंद पाईकराव | Updated: October 6, 2023 20:20 IST2023-10-06T20:20:11+5:302023-10-06T20:20:55+5:30
Nagpur News: भारतीय राज्य घटनेनुसार तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी विमुक्त भटक्या जमातीला गुन्हेगारी कायद्यातून मुक्त करून कलम ३४२ नुसार आरक्षणाचा लाभ मिळावा, असे नमुद केले.

Nagpur: बंजारा समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण द्या, गोरसिकवाडी संघटनेची मागणी
- दयानंद पाईकराव
नागपूर - भारतीय राज्य घटनेनुसार तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी विमुक्त भटक्या जमातीला गुन्हेगारी कायद्यातून मुक्त करून कलम ३४२ नुसार आरक्षणाचा लाभ मिळावा, असे नमुद केले. त्यानुसार बंजारा समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण द्यावे, अशी मागणी गोरसिकवाडी संघटनेचे प्रदेश सहसंयोजक श्रीकांत राठोड यांनी पत्रकार परिषदेत केली.
ब्रिटीशांच्या काळात बंजारा समाजाला क्रिमिनल ट्राईब म्हणून घोषित करण्यात आले होते. परंतु देश स्वातंत्र्य झाल्यानंतर पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी बंजारा समाजाची गुन्हेगारी कायद्यातून मुक्त करून या समाजाला आरक्षण देण्याचे राज्यघटनेत नमुद केले होते. परंतु आजपर्यंत बंजारा समाजाला आरक्षण न मिळाल्यामुळे या समाजाचे शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक नुकसान झाले आहे. बंजारा समाजाची आरक्षणाची मागणी खुप जुनी असून हा समाज मुलनिवासी आहे. त्यामुळे धनगर, मराठा समाजापूर्वी बंजारा समाजाला अनुसुचित जमातीत समाविष्ट करण्याची मागणी श्रीकांत राठोड यांनी केली आहे.