नागपुरात पाच अजून पॉझिटिव्ह; एकूण १४८
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 11:19 IST2020-05-02T10:49:12+5:302020-05-02T11:19:02+5:30
मंगळवारी सकाळी हाती आलेल्या अहवालानुसार नागपुरात कोरोनाबाधितांच्या संख्येत अजून पाच जणांची भर पडली आहे. या नव्या संख्येमुळे शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १४८ झाली आहे.

नागपुरात पाच अजून पॉझिटिव्ह; एकूण १४८
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: मंगळवारी सकाळी हाती आलेल्या अहवालानुसार नागपुरात कोरोनाबाधितांच्या संख्येत अजून पाच जणांची भर पडली आहे. या नव्या संख्येमुळे शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १४८ झाली आहे.
शुक्रवारी अमरावती वरूड येथून नागपुरातील मेडिकलमध्ये उपचारासाठी आलेली महिला रुग्णाचा नमुन पॉझिटिव्ह आला. या महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या रुग्णासह एम्स प्रयोगशाळेत चार असे एकूण पाच रुग्णांची नोंद झाली होती. कॉटन रोड तहसील वरूड, अमरावती येथील ४५वर्षीय महिलेला तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी नागपूरच्या मेडिकलमध्ये पाठविले. २९ एप्रिल रोजी पहाटे २.३० वाजता रुग्ण मेडिकलमध्ये पोहचला. ताप, सर्दी, खोकल्यासह श्वास घेणे कठीण जात असल्याची लक्षणे आहेत. त्याच दिवशी नमुना घेऊन मेडिकलच्या प्रयोगशाळेत पाठविले असता, नमुनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या महिलेची प्रवासाची पार्श्वभूमी नाही. या शिवाय कोणत्या पॉझिटिव्ह रुग्णाचाही संपर्कात आले नसल्याचे रुग्णाच्या नातेवाईकाकडून सांगण्यात येते. प्रयोगशाळेत चार नमुने पॉझिटिव्ह आले. परंतु त्यांचे वय व वसाहतींची माहिती सामोर आलेली नाही.