Nagpur: पारडीत पहाटे आगीचा भडका
By मंगेश व्यवहारे | Updated: May 5, 2024 11:44 IST2024-05-05T11:44:18+5:302024-05-05T11:44:53+5:30
Nagpur Fire News: पारडी येथील नेताजी नगर भागात एका फर्निचरच्या दुकानात पहाटे 3 वाजता आगीचा भडका उडाला. अग्निशामन विभागाला माहिती मिळाल्यानंतर कळमना अग्निशमन केंद्रातून तत्काळ अग्निशमन बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले.

Nagpur: पारडीत पहाटे आगीचा भडका
- मंगेश व्यवहारे
नागपूर - पारडी येथील नेताजी नगर भागात एका फर्निचरच्या दुकानात पहाटे 3 वाजता आगीचा भडका उडाला. अग्निशामन विभागाला माहिती मिळाल्यानंतर कळमना अग्निशमन केंद्रातून तत्काळ अग्निशमन बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले. अग्निशमन चे पथक घटनास्थळी पोहोचल्यानंतर दुकानातील लाकडी फर्निचर पेटून आगीच्या ज्वाळांचे लोट वाहत होते. अग्निशमन पथकाने लगेच कार्यवाही सुरू करून सकाळी सहा पर्यंत आगीवर नियंत्रण मिळविले. आगीमध्ये जुने लाकडी दरवाजे, दरवाजाच्या चौकटी व लाकडी पाट्या जाऊन खाक झाल्या. अग्निशमन विभागाने केलेल्या पंचनामानुसार दोन लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही.