शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

Nagpur Election Results 2019 :भाजपच्या गडाला हादरा : मुख्यमंत्री फडणवीस पाचव्यांदा विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 8:58 PM

Nagpur Election Results 2019 : Devendra Fadnavis Vs Ashish Deshmukh , Krushna Khopade Vs Puroshottam Hajare, Milind Mane Vs Nitin Raut , Mohan Mate Vs Girish Pandav,Sudhakar Deshmukh Vs Vikas Thakre , Vikas Kumbhare Vs Banty Shelke, Charansingh Thakur Vs Anil Deshmukh , Sudhir Parwe Vs Raju Parwe , Sunil Kedar Vs Rajiv Potdar , Tekchand Sawarkar Vs Suresh Bhoyar, Samir Meghe Vs Vijay Ghodmare , Mallikarjun Reddi Vs Udaysingh Yadav

ठळक मुद्देनागपूर पश्चिम, नागपूर उत्तर, काटोल, उमरेड, रामटेकमध्ये फेरबदलभाजप आमदार कृष्णा खोपडे व विकास कुंभारे विजयीमोहन मते यांनी दक्षिणची शान राखलीरामटेकचा गड अपक्ष आशीष जयस्वाल यांनी जिंकलाकाटोलची जागा अनिल देशमुखांनी खेचलीसावनेरमध्ये सुनील केदार विजयीउमरेडमध्ये फेरबदल, काँग्रेसचे राजीव पारवे विजयीकामठीत बावनकुळेंची पुण्याई, सावरकर तरलेहिंगण्यात मेघेंचे वर्चस्व कायम

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नागपूरचा बालेकिल्ला राखताना भाजपची मोठी दमछाक झाली. गेल्यावेळी १२ पैकी तब्बल ११ जागा जिंकणाऱ्या भाजपच्या गडाला यावेळी हादरा बसला. नागपूर पश्चिम, नागपूर उत्तर, काटोल, उमरेड, रामटेक या पाच जागा भाजपने गमावल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण-पश्चिममधून एकतर्फी विजय नोंदविला. तर नागपूर दक्षिण व कामठीमध्ये अखेरपर्यंत काट्याची टक्कर होऊन भाजपने बाजी मारली. काटोलमध्ये राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांनी एकहाती विजय मिळविला. तर रामटेकमध्ये शिवसेनेचे बंडखोर माजी आमदार आशीष जयस्वाल यांनी भाजपचे पाणीपत केले. 

नागपूर दक्षिण- पश्चिममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे आशीष देशमुख यांचा एकतर्फी पराभव केला. मतदारांनी फडणवीस यांच्या विकास कामांना भरभरून पावती दिली. फडणवीस यांनी या मतदारसंघातून हॅट्रीक मारली असून नागपुरातून ते पाचव्यांदा विधानसभेत पोहचले अहेत. 
नागपूर पूर्वमध्ये भाजपचे विद्यमान आमदार कृष्णा खोपडे यांनी विजयाची हॅट्रीक केली. त्यांनी काँग्रेसचे नगरसेवक पुरुषोत्तम हजारे यांना पराभूत केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या पाठबळाचा खोपडे यांना फायदा झाला. नागपूर पश्चिममध्ये तब्बल २० वर्षांनी भाजपचा अस्त तर काँग्रेसचा उदय झाला. येथे काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी भाजपचे विद्यमान आमदार सुधाकर देशमुख यांचा काट्याच्या लढतीत पराभव केला. 
नागपूर उत्तरमध्ये यावेळी उलटफेर झाला. काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांना गमावलेली जागा खेचण्यात यश आले. त्यांनी भाजपचे विद्यमान आमदार डॉ. मिलिंद माने यांचा पराभव केला. येथे गेल्यावेळीप्रमाणे बसपाचा हत्ती धावला नाही. तर वंचित बहुजन आघाडीदेखील लक्षणीय मतांपासून वंचित राहिली. दक्षिण नागपुरात भाजपने विद्यमान आमदार सुधाकर कोहळे यांचे तिकीट कापून माजी आमदार मोहन मते यांना संधी दिली होती. मते यांना काँग्रेसचे गिरीश पांडव यांनी कडवी झुंज दिली. काट्याच्या लढतीत मते यांनी बाजी मारली. भाजपचे बंडखोर सतीश होले व शिवसेनेचे बंडखोर किशोर कुमेरिया या दोन्ही माजी उपमहापौरांनी भाजपची मते खेचल्यामुळे मते यांना विजय मिळविताना दम लागला. काँग्रेसचे बंडखोर प्रमोद मानमोडे विशेष कामगिरी करू शकले नाहीत. नागपूर मध्यमध्ये भाजपचे विद्यमान आमदार विकास कुंभारे यांनी विजयाची हॅट्रीक मारली. त्यांनी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव बंटी शेळके यांचा पराभव केला. हलबा समाजाच्या एकगठ्ठा मतांनी कुंभारे यांना तारले. तर मुस्लिम समाजाला एकही तिकीट न मिळाल्याने नाराज असलेल्या मुस्लिम मतदारांनी ‘एमआयएम’ला दिलेल्या पसंतीचा काँग्रेसला फटका बसला.काटोलमध्ये राष्ट्रवादीचे अनिल देशमुख विजयी झाले. येथे भाजपचे चरणसिंग ठाकूर यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. गतवेळी काटोलची जागा भाजपने मिळविली होती. आशिष देशमुख यांनी आमदरकीचा राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख या मतदार संघात अधिक सक्रीय झाले. जातीय समीकरणाचा सर्वाधिक फायदा देशमुख यांना झाला.सावनेरमध्ये काँग्रेसचे सुनील केदार यांनी भाजपचे डॉ. राजीव पोतदार यांना पराभूत केले. पोतदार यांना जातीय समीकरणाचा फटका यांना बसला. कामठीत भाजपचे टेकचंद सावरकर यांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या विकास कामांची पुण्याई कामी आली. सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे सुरेश भोयर यांनी भाजपचे सावरकर यांना मागे टाकले होते. शहरी भागात मात्र काँग्रेसला मतदारांनी नाकारत भाजपचा विजय निश्चित केला.उमरेडमध्ये काँग्रेसचे राजू पारवे यांना भाजपचे सुधीर पारवे यांची हॅट्रीक रोखण्यात यश आले. त्यांच्या विजयासाठी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक मतदार संघात तळ ठोकून होते. सुधीर पारवे मितभाषी असले तरी मतदार संघातील रखडलेले प्रकल्प त्यांच्या पराभावाचे मुख्य कारण ठरले.रामटेकच्या गडावर शिवसेना बंडखोर अ‍ॅड.आशिष जयस्वाल यांनी भाजपचे पाणीपत केले. भाजपचे आ. डी.मल्लीकार्जून रेड्डी यांना पराभव पत्करावा लागला. हिंगण्यात भाजपचे समीर मेघे यांच्या विकास कामांना मतदारांनी कौल दिला. मेघे यांनी राष्ट्रवादीचे विजयबाबू घोडमारे यांचा पराभव केला. राष्ट्रवादीने येथे घोडमारे यांच्या रुपात नवा चेहरा दिला होता. मात्र मेघेंसमोर त्यांचा टिकाव लागला नाही.

असा आहे निकालभाजप : ६काँग्रेस : ०४राष्ट्रवादी : ०१अपक्ष : ०१

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसVikas Thakreविकास ठाकरेKrushna Khopdeकृष्णा खोपडेAnil Deshmukhअनिल देशमुख