Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 17:05 IST2025-12-21T17:02:08+5:302025-12-21T17:05:29+5:30

Nagpur Election Result 2025: नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपने नागपूरमध्ये पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजपचे सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून आले आहेत. 

Nagpur Election News: How many mayors are there in CM Fadnavis' district, where did BJP waste its money? | Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?

Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?

नागपूरमध्ये भाजपने पुन्हा एकदा सरस कामगिरी करत दबदबा कायम ठेवला आहे. २७ नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीचा अस्मान दाखवले. भाजपने तब्बल २२ ठिकाणी नगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली असून, महाविकास आघाडीला मानहानिकारक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. 

नागपूर जिल्ह्यातील २७ नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला २ जागांवर विजय मिळवता आला आहे. काँग्रेसला एकच जागा मिळाली आहे.   

नागपूर जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणूक निकाल

१) कामठी नगरपरिषद - भाजपचे अजय अग्रवाल विजयी 

२) उमरेड नगरपरिषद - भाजपच्या प्राजक्ता कारु विजयी 

३) काटोल नगररिषद - शेकाप व राष्ट्रवादी (शरद पवार) आघाडीच्या अर्चना देशमुख विजयी

४) वाडी नगरपरिषद - भाजपचे नरेश चरडे विजयी 

५) डिगडोह देवी नगरपरिषद - भाजपच्या पुजा अंबादास उके विजयी 

६) नरखेड नगरपरिषद - भाजपचे मनोज कोरडे विजयी 

७) सावनेर नगरपरिषद - भाजपच्या संजना मंगळे विजयी 

८) कळमेश्वर नगरपरिषद - भाजपचे अविनाश माकोडे विजयी 

९) रामटेक नगरपरिषद - शिंदेसेनेचे बिकेंद्र महाजन विजयी 

१०) बुटीबोरी नगरपरिषद - कॉंग्रेस समर्थित गोंडवाणा गणतंत्र पार्टीचे सुमित मेंढे विजयी 

११) मोहपा नगरपरिषद - कॉंग्रेसचे माधव चर्जन विजयी 

१२) खापा नगरपरिषद - भाजपचे पियुष बुरडे विजयी 

१३) मोवाड नगरपरिषद - भाजपच्या दर्शना ढोरे विजयी

१४) वानाडोंगरी नगरपरिषद - भाजपच्या सुनंदा बागडे विजयी

१५) कन्हान-पिंपरी नगरपरिषद - भाजपचे राजेंद्र शेंदरे विजयी 

१६) महादुला नगरपंचायत - भाजपच्या हेमलता ठाकूर विजयी 

१७) मौदा नगरपंचायत - भाजपचे प्रसन्ना तिडके विजयी 

१८) भिवापूर नगरपंचायत - भाजपच्या सुषमा श्रीरामे विजयी 

१९) बहादुरा नगरपंचायत - भाजपच्या प्रतीक्षा खंदाडे विजयी 

२०) कांद्री-कन्हान - भाजपचे सुजित पानतावणे विजयी 

२१) बिडगाव तरोडी नगरपंचायत - भाजपचे विरु जामगडे विजयी 

२२) बेसा-पिपळा नगरपंचायत - भाजपच्या किर्ती बडोले विजयी 

२३) पारशिवनी नगरपंचायत - शिंदेसेनेच्या सुनीता प्रकाश डोमकी विजयी 

२४) नीलडोह नगरपंचायत - भाजपच्या भूमिका विजयी 

२५) कोंढाळी नगरपंचायत - भाजपचे योगेश चाफले विजयी 

२६) गोधणी (रेल्वे) नगरपंचायत - भाजपच्या रोशना कोलते विजयी 

२७) येरखेडा नगरपंचायत- भाजपचे राजकिरण बर्वे विजयी

भाजपचे सर्वाधिक नगराध्यक्ष

भाजप - २२

शिंदेसेना - २

काँग्रेस - १

शेकाप -राष्ट्रवादी (शरद पवार) आघाडी - १

गोंडवाणा गणतंत्र पार्टी - १

Web Title: Nagpur Election News: How many mayors are there in CM Fadnavis' district, where did BJP waste its money?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.