नागपुरात कारमधून डॉक्टरची सव्वादोन लाख रोख असलेली बॅग लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 19:19 IST2017-12-16T19:18:20+5:302017-12-16T19:19:43+5:30
डॉक्टरच्या कारमध्ये ठेवलेली सव्वादोन लाखांची रोकड असलेली बॅग चोरट्याने लंपास केली. धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास ही घटना घडली.

नागपुरात कारमधून डॉक्टरची सव्वादोन लाख रोख असलेली बॅग लंपास
आॅनलाईन लोकमत
नागपूर : डॉक्टरच्या कारमध्ये ठेवलेली सव्वादोन लाखांची रोकड असलेली बॅग चोरट्याने लंपास केली. धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास ही घटना घडली.
वर्धा मार्गावरील कन्नमवार नगरात राहणारे डॉ. संग्राम गणपतराव वाघ (वय ४४) शुक्रवारी रात्री धंतोलीतील आशीर्वाद अपार्टमेंटजवळ टाईल्स बघायला गेले होते. त्यांनी आपली होंडा सिटी कार (एमएच ३१ / ईयू १३०) रस्त्याच्या कडेला लावली. कारमध्ये बॅग होती. तीत २ लाख, ३० हजारांची रोकड, चेकबूक आणि महत्त्वाची कागदपत्रे होती. टाईल्स बघून कारजवळ आल्यानंतर त्यांना कारमधील बॅग चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी धंतोली ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. चोरट्यांचा शोध घेतला जात आहे