शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
2
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
3
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
4
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
5
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
6
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
7
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
8
PHOTOS : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया रवाना; पहिल्या बॅचमध्ये हार्दिक पांड्या दिसला नाही
9
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
10
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
11
"कुणाच्या तरी चुकीमुळे कोणीतरी जीव गमावतं...", अपघाताबाबत अभिजीत खांडकेकर स्पष्टच बोलला
12
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
13
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
14
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
15
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
16
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
17
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
18
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
19
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
20
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी

नागपुरात सायबर गुन्हेगाराचा पोलिसाला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 1:01 AM

चोरी-बनवाबनवी करणाऱ्यांच्या मुसक्या बांधण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसाला एका ठगबाजाने गंडा घातला. क्रेडिट कार्डची माहिती घेतल्यानंतर त्याला एक ओटीपी नंबर पाठवून सायबर गुन्हेगाराने पोलीस कर्मचाऱ्याचे २० हजार रुपये हडपले. गिट्टीखदान पोलिसांच्या हद्दीत २० मार्चला ही घटना घडली.

ठळक मुद्देओटीपीचा फंडा : २० हजारांचा गंडा, गिट्टीखदानमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चोरी-बनवाबनवी करणाऱ्यांच्या मुसक्या बांधण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसाला एका ठगबाजाने गंडा घातला. क्रेडिट कार्डची माहिती घेतल्यानंतर त्याला एक ओटीपी नंबर पाठवून सायबर गुन्हेगाराने पोलीस कर्मचाऱ्याचे २० हजार रुपये हडपले. गिट्टीखदान पोलिसांच्या हद्दीत २० मार्चला ही घटना घडली.गिट्टीखदानमधील कामगारनगर, पोलीस लाईन टाकळी येथे दीपक शालिकराम झाडे (वय ४५) राहतात. ते पोलीस कर्मचारी असून वाहन विभागात सेवारत आहेत. २० मार्च रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर एक फोन आला. पलीकडून बोलणाऱ्या आरोपीने बजाज फायनान्स कंपनीच्या क्रेडिट कार्डविषयी आधी माहिती घेतली. त्यानंतर झाडेंना एक ओटीपी नंबर आला. तो ओटीपी नंबर विचारून त्यांच्या नावावर फोन करणाऱ्या आरोपीने फ्लिपकार्ट कंपनीच्या माध्यमातून ३९ हजार ६९ रुपयांचा मोबाईल विकत घेतला. या मोबाईलची किस्त भरण्याच्या संबंधाने झाडे यांच्या नागपूर नागरिक सहकारी बँकेच्या खात्यातून २० हजार रुपये कपात केले. ते लक्षात आल्यानंतर झाडे यांनी बजाज फायनान्स कंपनीत विचारपूस केली असता, त्यांच्या नावाने अज्ञात आरोपीने मोबाईल विकत घेऊन फसविल्याचे कळले. झाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी ठगबाजाविरुद्ध गुन्हा नोंदविला. त्याचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिस