नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल

By योगेश पांडे | Updated: May 4, 2025 22:49 IST2025-05-04T22:48:12+5:302025-05-04T22:49:14+5:30

Nagpur Crime News: शिंदेसेनेतील पदाधिकारी व संपर्क प्रमुखाविरोधात नागपुरात विनयभंग व फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यता आला आहे. महिला उद्योजिकेच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. त्याने दीड कोटींची फसवणूक केल्याचा तक्रारीत दावा करण्यात आला आहे.

Nagpur Crime News: A case of molestation and cheating has been registered against a Shinde Sena office bearer in Nagpur. | नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल

नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल

- योगेश पांडे
 नागपूर - शिंदेसेनेतील पदाधिकारी व संपर्क प्रमुखाविरोधात नागपुरात विनयभंग व फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यता आला आहे. महिला उद्योजिकेच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. त्याने दीड कोटींची फसवणूक केल्याचा तक्रारीत दावा करण्यात आला आहे. संबंधित आरोपी फरार असून पोलिसांकडून शोध सुरू आहे. बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

मंगेश विजय काशीकर (शंकरनगर) असे आरोपीचे नाव आहे. संबंधित महिला व्यावसायिक असून काशीकरसोबत पावणेदोन वर्षांअगोदर एका परिचिताच्या माध्यमातून ओळख झाली होती. बजाजनगरात काशीकरचे हॉटेल होते. त्याने ते हॉटेल महिलेने चालवावे व १० टक्केच रक्कम मला द्यावी लागेल असा प्रस्ताव ठेवला. महिलेने दीड कोटी रुपयांचे कर्ज काढून हॉटेलचे नूतनीकरण करत ते सुरू केले. मात्र याबाबत कुठलाही करारनामा झाला नव्हता. तिने काशीकरला याबाबत म्हटले असता त्याने उडवाउडवीची उत्तर देत टाळाटाळ केली. प्रत्यक्षात ती जागा काशीकर ऐवजी दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर होती. महिलेने ठरल्याप्रमाणे काशीकरला तीन ते चार महिने १० टक्के नफ्याची रक्कमदेखील दिली होती. मात्र काशीकरने नंतर वाद घातला व जास्त पैसे मागत हॉटेल बंद करण्याची धमकी दिली. महिलेने काशीकरला सामोपचाराने वागण्यास सांगितले.

मात्र काशीकरने तिला व तिच्या कुटुंबियांना पिस्तुल दाखवत ठार मारण्याची धमकी दिली. राजकीय संबंध वापरत खोट्या गुन्ह्यात अडकवेन अशी धमकी त्याने दिली. काशीकरने संबंधित महिलेला वाईट पद्धतीने स्पर्श केला होता. त्यामुळे महिलादेखील संतापली होती. अखेर तिने काशीकरविरोधात तक्रार केली. पोलिसांनी काशीकरविरोधात विनयभंग व फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. काशीकरचा शोध सुरू आहे.

Web Title: Nagpur Crime News: A case of molestation and cheating has been registered against a Shinde Sena office bearer in Nagpur.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.