लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुलीसोबत भेटण्यास व बोलण्यास मनाई केल्यामुळे संतापलेल्या प्रियकराने साथीदारांसह प्रेयसीच्या वडिलांच्या छातीत लोखंडी सळई खुपसून त्यांचा खून केला. तसेच मदतीसाठी आलेल्या त्यांच्या मेहुण्यालाही धारदार शस्त्रांनी वार करून गंभीर जखमी केले. ही घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मातोश्रीनगर परिसरात गुरुवारी रात्री घडली. दरम्यान एमआयडीसी पोलिसांनी
पंकज ठाकूर (४५, रा. मातोश्रीनगर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते राज्य राखीव पोलिस दलात चालक होते. तर अर्पित (३०) असे गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या मेहुण्याचे नाव आहे. आरोपीत आकाश हरिदास मंडल (२३), हर्षित हरिदास मंडल (२६) व त्यांची आई पुष्पा हरिदास मंडल (४७) सर्वजण रा. मातोश्रीनगर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आकाशचे पंकज ठाकूर यांच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. त्यावरून पंकज ठाकूर यांचा मागील दोन वर्षांपासून आरोपी आकाशसोबत वाद सुरु होता. त्यांनी अनेकदा आरोपी आकाशला मुलीपासून दूर राहण्यास सांगीतले होते. त्यानंतरही आरोपी आकाश त्यांच्या मुलीच्या संपर्कात होता.
गुरुवारी परिसरातील मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त कार्यक्रम सुरु असताना पुन्हा पंकज ठाकूर यांना आरोपी आकाश मुलीला बोलताना दिसला. त्यांचा आकाशसोबत वाद होऊन त्यांनी आरोपी आकाशला मारहाण केली. आकाशने घरी जाऊन आई व मोठ्या भावाला मारहाणीबाबत सांगितले. मुलाला मारहाण झाल्याचे समजताच आरोपी आकाशची आई पुष्पा व मोठा भाऊ हर्षित संतप्त झाले. ते जाब विचारण्यासाठी पंकज ठाकूर यांच्याकडे गेले. तेथे पुन्हा त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर आरोपींनी लोखंडी सळई व धारदार शस्त्राने पंकज ठाकूर यांच्यावर हल्ला चढविला. त्यांनी लोखंडी सळई पंकज ठाकूर यांच्या छातीत खूपसून त्यांना रक्ताच्या थारोळ्यात लोळवले. पंकज ठाकूर यांना मारहाण होत असल्याचे पाहून त्यांचे मेहुणे अर्पित हे बचावासाठी धावले असता आरोपींनी धारदार शस्त्रांनी गळ्यावर व पोटावर वार करून त्यांनाही गंभीर जखमी केले. रक्तबंबाळ झालेल्या पंकज ठाकूर व अर्पित यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी पंकज ठाकूर यांना तपासून मृत घोषित केले. तर त्यांचे मेहुणे अर्पित यांच्यावर उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोकुल महाजन यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तीन्ही आरोपींना अटक केली.............
Web Summary : In Nagpur, a man murdered his girlfriend's father for forbidding their relationship. The enraged lover, with accomplices, fatally stabbed the father and seriously injured his brother-in-law during a Hanuman Jayanti event. Police arrested the perpetrators.
Web Summary : नागपुर में, एक व्यक्ति ने अपनी प्रेमिका के पिता की हत्या इसलिए कर दी क्योंकि उन्होंने उनके रिश्ते पर आपत्ति जताई थी। क्रोधित प्रेमी ने साथियों के साथ मिलकर हनुमान जयंती के कार्यक्रम के दौरान पिता को मार डाला और उसके बहनोई को गंभीर रूप से घायल कर दिया। पुलिस ने अपराधियों को गिरफ्तार कर लिया।