Nagpur is the coldest in Vidarbha: mercury at 10.6 degrees | विदर्भात नागपूर सर्वात थंड  : पारा १०.६ डिग्रीवर
विदर्भात नागपूर सर्वात थंड  : पारा १०.६ डिग्रीवर

ठळक मुद्देपारा आणखी घसरणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : थंड हवेमुळे नागपुरातील पारा खाली घसरला असून शुक्रवारी १०.६ डिग्रीसह नागपूर पूर्ण विदर्भात सर्वात थंड राहिले. सरासरीपेक्षा ३ डिग्रीने पारा खाली घसरल्यामुळे हुडहुडी भरली आहे. साधारपणे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पारा खाली येण्यास सुरुवात होते.
हवामान विभागानुसार उत्तर भारताकडून येणाऱ्या थंड हवेमुळे पारा खाली घसरायला सुरुवात झाली. आकाशातील ढग हटल्यामुळे वातावरण शुष्क बनले आहे. थंडी वाढण्याचे हे सुद्धा एक कारण आहे. मागील २४ तासात तापमानावर नजर टाकली तर अधिकांश जिल्ह्यातील रात्रीचे तापमान दोन ते तीन डिग्रीने खाली आल्याचे दिसून येते. येणाऱ्या दोन ते तीन दिवसात पारा आणखी खाली येईल आणि थंडी वाढण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नागपूरनंतर गोंदिया सर्वाधिक थंड राहिले. येथे किमान तापमान ११.८ डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आले. तर ब्रह्मपुरी १२.४, वाशिम १३, यवतमाळ १३.४, अकोला १३.६, वर्धा १३.९, चंद्रपूर १४, गडचिरोली १४.२, अमरावती, बुलडाणा येथील किमान तापमान १४.४ डिग्री सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले.
दोन दिवसात ५.५ डिग्रीने पारा घसरला
गेल्या दोन दिवसात नागपुरातील किमान तापमान ५.५ डिग्री सेल्सिअसने खाली आल्याची नोंद आहे. तर २४ तासात ३.१ डिग्रीने पारा खाली घसरला. आजचा दिवस हा या मोसमातील सर्वात थंड दिवस राहिला.

Web Title: Nagpur is the coldest in Vidarbha: mercury at 10.6 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.