नागपुरात वाडीचे नगराध्यक्ष प्रेमनाथ झाडे एसीबीच्या जाळ्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 15:14 IST2019-05-17T13:03:49+5:302019-05-17T15:14:58+5:30

एका खासगी संस्थेच्या तीन अभियंत्याचे वेतन काढून देण्यासाठी २४  हजारांची लाच मागून त्यापैकी २० हजारे रुपये स्विकारणारे भाजपचे नेते आणि वाडी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रेमनाथ झाडे यांनी शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

The Nagpur City Council president of Nagpur caught accepting bribe | नागपुरात वाडीचे नगराध्यक्ष प्रेमनाथ झाडे एसीबीच्या जाळ्यात 

नागपुरात वाडीचे नगराध्यक्ष प्रेमनाथ झाडे एसीबीच्या जाळ्यात 

ठळक मुद्देमालमत्तेची चौकशी सुरूघरातच स्विकारली लाचेची रक्कम वाडीत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ 

नागपूर:
:लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर (वाडी) : वाडी नगर परिषदेत काम करणाऱ्या एका खासगी संस्थेच्या तीन अभियंत्याचे वेतन काढून देण्यासाठी २४  हजारांची लाच मागून त्यापैकी २० हजारे रुपये स्विकारणारे भाजपचे नेते आणि वाडी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रेमनाथ झाडे यांनी शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
वाडी नगर परिषदेत पुरवठादार संस्थेने  तीन स्थापत्य अभियंत्याचा पुरवठा केला होता. त्यांचे चार महिन्यांचे वेतन काढून देण्यासाठी संस्थेच्या संचालकाकडे झाडे यांनी २४ हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली होती. संस्थेने या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला १६ मे रोजी तक्रार दिली होती. एसीबीच्या अधिका-यांनी रचलेल्या सापळ्यानुसार, संस्थाचालक आणि झाडे यांच्यात २० हजार रुपये लाच देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार लाचेची रक्कम घेऊन तक्रारदार झाडे यांच्याकडे शुक्रवारी सकाळी १० वाजता पोहचले. त्यांच्याकडून झाडे यांनी लाचेची रक्कम स्विकारताच बाजुलाच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने झाडेंना रंगेहात पकडले. वाडीचे नगराध्यक्ष लाच घेताना पकडले गेल्याचे कळाल्याने जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. कारवाईनंतर झाडे यांना लाचलुचप प्रतिबंधक विभागाच्या नागपूर येथील कार्यालयात आणण्यात आले. वृत्त लिहिस्तोवर अधिकारी त्यांची चौकशी करीत होते. 

 

 

Web Title: The Nagpur City Council president of Nagpur caught accepting bribe