शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

नागपूर शहर बस तिकीट घोटाळा : ३५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 20:07 IST

तिकीट विक्रीचे इटीएम मशीन व कॅश कार्डचा गैरवापर करून शहर बस परिवहन विभागात साडेबारा लाखांचा गैरव्यवहार करणाऱ्या ३५ आरोपींविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्दे१२.५५ लाखांचा घोटाळा : इटीएम मशीन व कॅश कार्डचा गैरवापर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तिकीट विक्रीचे इटीएम मशीन व कॅश कार्डचा गैरवापर करून शहर बस परिवहन विभागात साडेबारा लाखांचा गैरव्यवहार करणाऱ्या ३५ आरोपींविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.मोहम्मद इरशाद मोहम्मद जावेद (रा. नेर, जि. यवतमाळ), संदीप राऊत, वैभव तितरमारे (रा. श्री हरी रोड, शांतिनगर), सचिन गणवीर (रा. आमघाट, पिपळा), स्वप्निल मून (रा. भीमनगर, हिंगणघाट, जि. वर्धा), हर्षल निंबाळकर, पंकज मेंढे (रा. उप्पलवाडी), विशाल राऊत, धीरज गजघाटे (दोघेही रा. चंद्रमणीनगर), सचिन शेंभेकर (रा. वडधामना), राजेश सरोदे (रा. पिपळा फाटा), राजेंद्र बोडखे (रा. वाठोणा, ता. नरखेड), अमोल श्रीखंडे (रा. देवबर्डी, मोहपा), प्रवीण काळबांडे (रा. मन्नारखेडी, सावरगांव), विलास सोनकुसरे (रा. विनोदनगर), यशवंत खोब्रागडे (रा. यशोधरानगर), रितेश छिवरे (रा. इतवारी), दीपक सोमकुंवर, अरविंद गोलाईत (दोघेही रा. महेंद्रनगर, बिनाकी), मंगेश शेंडे (रा. शिवनगर, चनकापूर), विजयकुमार कनोजिया (रा. भाजीमंडी, शितला माता मंदिर जवळ, कामठी), भूपेश वाघमारे (रा. अयोध्यानगर), संतोष यादव (रा. सिल्लेवाडा), आशिष बहादे (रा. चंद्रमणीनगर), विजय त्रिवेदी (रा. नवीन शुक्रवारी), अजय मगनलाल गुप्ता (रा. झिंगाबाई टाकळी), कमलेश पाटील (रा. जुनी शुक्रवारी), उमेश कुटे (रा. ईसासनी), धर्मेंद्र काळे (रा. जुनी कामठी), अनिल डहाके (रा. दहेगाव रंगारी), संदीप पाटील (रा. गोरेवाडा), कमलाकर कोडावते (रा. फुकटनगर), सागर बिबे (रा. योगी अरविंदनगर), सूरज बागडे (रा. सरस्वतीनगर, इंदोरा) आणि महेंद्र भाजीखाये (रा. सावंगा) अशी आरोपींची नावे आहेत.अटक कुणालाच नाहीसर्व आरोपी आपली (स्टार) बसमध्ये वाहक म्हणून कार्यरत होते. १ जुलै २०१७ ते १५ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत आरोपींनी संगनमत करून अफरातफरीचा कट रचला. त्यानुसार तिकीट विक्रीचे इटीएम मशीन व कॅश कार्डचा गैरवापर करून १२ लाख ५४ हजार ९६५ रु.चा अपहार केला. ही बनवाबनवी उघड झाल्यानंतर रवींद्र राम पागे (वय ६२, रा. गणपती अपार्टमेंट, महाल) यांच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शुक्रवारी रात्रीपर्यंत कुणालाही अटक झालेली नव्हती. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाCrimeगुन्हा