नागपुरात भरधाव टँकरने बालकाला चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 23:09 IST2018-04-10T23:08:29+5:302018-04-10T23:09:14+5:30
पाणीपुरवठा करणाऱ्या एका भरधाव टँकरने रस्त्यावर खेळणाऱ्या एका बालकाला चिरडले. मोहम्मद नावेद अमानउल्ला अंसारी (वय १२ वर्षे) असे मृत बालकाचे नाव आहे. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकतानगर भागात मंगळवारी दुपारी १२.४५ च्या सुमारास ही घटना घडली.

नागपुरात भरधाव टँकरने बालकाला चिरडले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाणीपुरवठा करणाऱ्या एका भरधाव टँकरने रस्त्यावर खेळणाऱ्या एका बालकाला चिरडले. मोहम्मद नावेद अमानउल्ला अंसारी (वय १२ वर्षे) असे मृत बालकाचे नाव आहे. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकतानगर भागात मंगळवारी दुपारी १२.४५ च्या सुमारास ही घटना घडली.
नावेद मूलत: जौनपूर (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी होता. तो त्याच्या परिवारासह नातेवाईकाच्या येथे असलेल्या लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी आला होता. एकतानगरातील चिश्तीया चौकात त्याच्या मोठ्या आईचे घर आहे. वस्तीतील मुलांसोबत तो मंगळवारी दुपारी कंचे खेळत होता. या भागात आलेल्या पाण्याच्या टँकर (एमएच ४९/ ३५८) चालकाने वेगात रिव्हर्स घेत नावेदला चिरडले. त्याचा घटनास्थळीच करुण अंत झाला तर काही मुले जखमी झाली. या अपघातामुळे घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. ते पाहून आरोपी चालक पळून गेला. यशोधरानगर पोलिसांनी मोहम्मद नजिर यांच्या तक्रारीवरून आरोपी टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याचा शोध घेतला जात आहे.
सीसीटीव्हीत अपघाताचे दृश्य
या भीषण अपघाताचे दृश्य परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाले आहे. त्यात टँकरचालकाच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात झाल्याचे दिसते, असे सूत्र सांगतात.