नागपुरात प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 00:02 IST2018-12-28T00:01:39+5:302018-12-28T00:02:33+5:30

लग्नाचे आमिष दाखवून दीड वर्षांपासून तरुणीसोबत शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या आरोपीने आता लग्नास नकार दिल्याने तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी आरोपी अनिकेत चंद्रशेखर तिरपुडे (वय २०) याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

In Nagpur, a case of rape has been registered against boyfriend | नागपुरात प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल

नागपुरात प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल

ठळक मुद्देशरीरसंबंधानंतर लग्नास नकार : प्रेयसीची पोलिसांत धाव

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून दीड वर्षांपासून तरुणीसोबत शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या आरोपीने आता लग्नास नकार दिल्याने तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी आरोपी अनिकेत चंद्रशेखर तिरपुडे (वय २०) याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
आरोपी अनिकेत अजनीतील श्रमजिवीनगरात राहतो. त्याच्याच वस्तीत राहणाºया तरुणी (वय २०) सोबत त्याचे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. २५ आॅगस्ट २०१७ ला लग्नाच्या आणाभाका घेऊन त्याने तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर नेहमीच या दोघांमध्ये शरीरसंबंध प्रस्थापित होऊ लागले. १८ नोव्हेंबर २०१८ ला तरुणीने त्याच्याकडे लग्नाचा विषय काढला असता त्याने लग्नास नकार दिला. तेव्हापासून त्याची वेगवेगळ्या पद्धतीने समजूत काढून त्याला लग्नास तयार करण्याचे प्रयत्न तरुणी करू लागली. मध्यस्थांनीही आरोपी अनिकेतला समजावून सांगितले. मात्र, त्याची नकारघंटा कायम असल्याने तरुणीने अजनी पोलिसांकडे बुधवारी तक्रार नोंदवली. पोलिसांनी अनिकेतविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. वृत्त लिहिस्तोवर त्याला अटक झालेली नव्हती.

Web Title: In Nagpur, a case of rape has been registered against boyfriend