Nagpur: कुत्रा गेटसमोर आणल्याने हटकल्याने भाऊ-बहिणीस बेदम मारहाण
By योगेश पांडे | Updated: March 22, 2024 22:29 IST2024-03-22T22:28:44+5:302024-03-22T22:29:03+5:30
Nagpur News: सायंकाळी घराच्या गेटसमोर कुत्रा फिरवायला आणणाऱ्या तरुणीला हटकल्याने तिने मित्रांना बोलवून घरातील भाऊबहिणीस बेदम मारहाण केली. राणाप्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

Nagpur: कुत्रा गेटसमोर आणल्याने हटकल्याने भाऊ-बहिणीस बेदम मारहाण
- योगेश पांडे
नागपूर - सायंकाळी घराच्या गेटसमोर कुत्रा फिरवायला आणणाऱ्या तरुणीला हटकल्याने तिने मित्रांना बोलवून घरातील भाऊबहिणीस बेदम मारहाण केली. राणाप्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
राखी डिकाटे असे तक्रारदार तरुणीचे नाव आहे. २० मार्च रोजी सायंकाळी सात वाजता एक तरुणी राखीच्या घरासमोर कुत्रा घेऊन आली. कुत्रा तेथे घाण करेल , त्यामुळे त्याला पुढे घेऊन जा असे राखीने तिला म्हटले. यावरून ती तरुणी चिडली व तिने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. राखीचा भाऊ मुकेश व कुटुंबियांनीदेखील त्या तरुणीला समजावले. थोड्यावेळाने ती तरुणी तेथे परतली व तिच्यासोबत दोन कारमध्ये पाच ते सहा मुले होती. गाडीतून आदित्य राऊत नावाचा तरुण खाली उतरला व त्याने मुकेशसह त्याच्या कुटुंबियांना शिवीगाळ सुरू केली. माझ्या बहिणीला कसे काय हटकले असे म्हणत त्याने आक्रमक पवित्रा घेतला. आदित्य व त्याच्या साथीदारांनी राखी व मुकेशला मारहाण सुरू केली. त्यांनी भावाबहिणीला पाहून घेण्याची धमकी दिली व तेथून आरोपी निघून गेले. या हल्ल्यात राखी व मुकेश जखमी झाले. राखीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आदित्य राऊत, प्राची राऊत व इतर साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.