शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra SSC 10th Result 2024 : दहावीचा निकाल ९५.८१ टक्के; 'कोकण-कन्या' अव्वल, १८७ विद्यार्थ्यांना 'शत-प्रतिशत'
2
दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणूक? राजकीय पक्षांकडून तयारी सुरू; अजित पवार, बावनकुळेंच्या हालचाली
3
रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉ. श्रीहरी हलनोरने घेतले ३ लाख; पुणे पोलिसांची माहिती
4
गेल्या महिन्यापासून देशात विरोधकांची हवा; जोरदार टक्कर दिल्याची अमित शाह यांची कबुली
5
"ज्याने सुरु केलेय, त्यानेच संपवावे"; उद्धव ठाकरेंच्या युतीत परतण्यावर अमित शाह यांचे मोठे संकेत
6
“पुतिन अन् शेख हसीना यांनी केले तेच आता मोदी करु पाहात आहेत”; अरविंद केजरीवाल यांची टीका
7
देख रहा है बिनोद...!अवघ्या काही तासात रिलीज होणार 'पंचायत 3', जाणून घ्या नेमकी वेळ
8
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
9
Uma Bharti : "मोदी 400 नाही, तर 500 पार करतील..."; भाजपाच्या जागांवर उमा भारती यांचा मोठा दावा
10
हैदराबाद हरल्याने अमिताभ बच्चन निराश; म्हणाले, "SRH ची मालकीण सुंदर तरुणी..."
11
Mamata Banerjee : "देव असाल तर आम्ही मंदिर बांधू, पण..."; ममता बॅनर्जींचा पंतप्रधान मोदींना खोचक टोला
12
“अंतरिम जामिनाची मुदत ७ दिवसांनी वाढवून मिळावी”; केजरीवाल यांची सुप्रीम कोर्टाला विनंती
13
धक्कादायक! प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याची गोळी मारून हत्या, जॉनी वॅक्टरचा ३७व्या वर्षी मृत्यू
14
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
15
दलजीत कौरच्या पतीला लग्नच मान्य नाही? अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट; वाद चव्हाट्यावर
16
Crorepati Calculator: 'या' स्ट्रॅटजीनं गुंतवणूक केली तर, २०००० सॅलरी घेणारेही होतील कोट्यधीश, पाहा कॅलक्युलेशन
17
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, Adani Portsच्या शेअरमध्ये तेजी, Wipro घसरला
19
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
20
"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हुड्डाने मनातली भावना स्पष्टच सांगितली

नागपुरात तंबाखूविरोधी जनजागृती रॅलीने वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 10:16 PM

जागतिक तंबाखूविरोधी दिनाच्या निमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलच्यावतीने तंबाखूविरोधी रॅली काढून जनजागृती करण्यात आली आहे. रॅलीचा समारोप कॅन्सरशी लढा देऊन विजय मिळविलेल्या रुग्णांच्या मनोगतातून झाला. याप्रसंगी ‘तंबाखू म्हणजेच कॅन्सर’ या विषयावर आयोजित रुग्णालयाच्या परिसरात चित्र प्रदर्शनाचे आयोजनही करण्यात आले होते.

ठळक मुद्देजागतिक तंबाधूविरोधी दिन : डॉक्टरांसह विविध सामाजिक संघटनांचा पुढाकार

लोकमत न्यूज  नेटवर्कनागपूर : जागतिक तंबाखूविरोधी दिनाच्या निमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलच्यावतीने तंबाखूविरोधी रॅली काढून जनजागृती करण्यात आली आहे. रॅलीचा समारोप कॅन्सरशी लढा देऊन विजय मिळविलेल्या रुग्णांच्या मनोगतातून झाला. याप्रसंगी ‘तंबाखू म्हणजेच कॅन्सर’ या विषयावर आयोजित रुग्णालयाच्या परिसरात चित्र प्रदर्शनाचे आयोजनही करण्यात आले होते.रॅलीची सुरुवात मानेवाडा रोडवरील कॅन्सर हॉस्पिटलमधून झाली. यावेळी तंबाखूमुळे होणारे विविध कॅन्सर, त्याची लक्षणे व उपचाराचे फलक घेऊन डॉक्टरांसह विद्यार्थी सहभागी झाले होते. या रॅलीमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन, व्ही.एस.पी.एम. दंत महाविद्यालय, श्री आयुर्वेदिक महाविद्यालय, झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, महाराष्ट्र नेत्ररोग संघटना, रेडिओलॉजीकल व इमेजींग असोसिएशन, नागपूर मेडिकोज, रोटरी क्लब नागपूर, लायन्स क्लब नागपूर मेडिकोज व नागपूर नोबल, कुंभलकर सोशलवर्क कॉलेज, मधुकरराव महाकाळकर नर्सिंग स्कूल, श्युअरटेक नर्सिंग कॉलेज, दळवी नर्सिंग कॉलेज, स्नेहांचल, हेडगेवार रक्तपेढी, प्रजापती ब्रम्हकुमारीज आंतरराष्ट्रीय विश्वविद्यापीठ, आधार फाऊंडेशन आदी संघटनांचा सहभाग होता. रॅलीला हिरवी झेंडी इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) अध्यक्ष डॉ. कुश झुनझुनवाला यांनी दाखवली.रॅलीच्या समारोपप्रसंगी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात प्रजापती ब्रम्हकुमारी आशा दीदी यांनी अध्यात्म व सकारात्मकतेचे महत्त्व विशद केले. यातून कर्करोगाशी लढण्याचे आत्मबळ मिळते असेही त्या म्हणाल्या. कॅन्सर हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुब्रजीत दासगुप्ता यांनी पालकांनी मुलांसमोर व्यसन करू नये, असे आवाहन केले. ते म्हणाले, मुलांना तंबाखू, खुटका, सिगारेट आणण्यास सांगितल्यास मुले त्या वस्तू चाखून पाहतात. पुढे त्याचे व्यसनात रुपांतर होते.संचालन रुग्णालयाचे सहसंचालक डॉ. बी.के. शर्मा यांनी केले. कार्यक्रमाला ‘आयएमए’चे डॉ. प्रकाश देव डॉ. रफत खान, डॉ. कपिल बहाई,डॉ. विरल शहा, डॉ. यश अग्रवाल, डॉ. मधुकर खेरडे, डॉ. अर्चना कोठारी, डॉ. वंदना काटे, डॉ. वैभव कारेमोरे, डॉ. आशिष खंडेलवाल, सुधाकर आचार्य, डॉ. गोपाळ अरोरा आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अवतराम चावला, डॉ. पुर्णिमा चिंचमलातपुरे, डॉ. प्रसन्न जोशी, डॉ. सत्यशील सप्रे, डॉ. डी.पी. सेनगुप्ता, डॉ.अंजली कोल्हे, डॉ. उमाशंकर पछेल, डॉ. प्रफ्फुल चहांदे, डॉ. प्रशांत ढोक, डॉ. अनिरुद्ध वाघ, डॉ. आर. रणदिवे, डॉ. अमोल हेडाऊ, शाहिद अली, डॉ. राहुल ठाकरे आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :anti gutka campaignगुटखाविरोधी मोहीमcancerकर्करोग