शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

असा आहे नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 10:05 AM

महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाच्या रचनेनुसार अनुक्रमाने दहावा येणारा मतदारसंघ म्हणजे, नागपूर लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघात नागपूर जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

ठळक मुद्देएकमेव महिला खासदार या मतदारसंघातून एकदाच काँग्रेसच्या तिकिटावर अनुसयाबाई काळे या एकमेव महिला खासदार १९५७ साली निवडून गेल्या आहेत. त्यानंतर सातत्याने हा मतदारसंघ पुरुष उमेदवारांकडेच राहिलेला आहे. विशेष म्हणजे सर्वच प्रमुख पक्षांनी येथे महिला उमेदवार देणे स

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाच्या रचनेनुसार अनुक्रमाने दहावा येणारा मतदारसंघ म्हणजे, नागपूर लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघात नागपूर जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यामध्ये नागपूर दक्षिण- पश्चिम, नागपूर दक्षिण, नागपूर पूर्व, नागपूर मध्य, नागपूर पश्चिम आणि नागपूर उत्तर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. मतदारसंघ पुनर्रचनेपूर्वी कामठी विधानसभा मतदारसंघ हा नागपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग होता. मात्र, पुनर्रचनेत कामठी मतदारसंघ रामटेक लोकसभेला जोडण्यात आला व नागपूर शहरातील पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे पश्चिम व दक्षिण-पश्चिम असे दोन विधानसभा मतदारसंघ करण्यात आले होते. नागपूर महापालिकेतील १५१ नगरसेवक या अंतर्गत येतात. दाट वस्तीचा मतदारसंघ अशी या मतदारसंघाची ओळख आहे.एकेकाळी देशाच्या माजी पंतप्रधानांनी दोन वेळा प्रतिनिधित्व केलेला हा विदर्भातील लक्षवेधी मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल, सावनेर, हिंगणा, उमरेड, कामठी व रामटेक हे सहा विधानसभा मतदारसंघ रामटेक लोकसभा मतदारसंघात मोडतात. १९७७ ते २०१४ या ३७ वर्षातील १२ निवडणुकांवर नजर टाकली तर आठ वेळा काँग्रेस पक्षाच्या आणि चार वेळा शिवसेनेच्या बाजूने मतदारांनी कौल दिला आहे. १९९९, २००४ मध्ये तेराव्या आणि चौदाव्या लोकसभेत शिवसेनेच्या सुबोध मोहित्यांनी रामटेकचा गड सर केला होता. नारायण राणेंच्या बंडखोरीनंतर व काँग्रेस प्रवेशामुळे त्यांचे जे समर्थक आमदार, खासदार होते त्यापैकी सुबोध मोहित्यांनी २००६ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला व एप्रिल २००७ रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून निवडणूक लढविली. या निवडणुकीत शिवसनेचे प्रकाश जाधव यांनी ३२ हजार ५७२ हजार मतांनी मोहिते यांचा पराभव केला. या निवडणुकीत माजी मंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांनी बंडखोरी करीत ७९,६३८ मते मिळविली. देशमुख यांची बंडखोरी व मोहिते यांच्या पक्षांतराला मतदारांनी नापसंती दर्शविली होती. यानंतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक यांनी २००९ मध्ये हा मतदारसंघ काँग्रेसकडे खेचला होता. मात्र २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेत शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी रामटेकचा गड सर केला. वासनिक यांना तब्बल १,७५,७९१ मतांनी पराभूत करीत रामटेकच्या गडावर तुमाने यांनी पुन्हा एकदा भगवा फडकविला. यावेळी रामटेकचा गड सर करण्यात कुणाला यश येते व कुणाचा कडेलोट होतो, याकडे वैदर्भीय जनतेचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसचा गड भाजपाने दोनदा भेदला१९५७च्या लोकसभा निवडणुकीपासून हा मतदारसंघ अस्तित्वात आला. पारंपरिक काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून सातत्याने काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात दोन वेळा भाजपने काँग्रेसला दणका दिलेला आहे. यामध्ये एकदा १९९६ च्या निवडणुकीत, तर दुस-यांदा २०१४च्या निवडणुकीत हा मतदारसंघ भाजपने खेचून आणला आहे. या मतदारसंघातून काँग्रेसने दहा वेळा आपला खासदार लोकसभेत पाठवला आहे. याशिवाय विदर्भाच्या विभाजनासाठी आग्रही असणारे जांबुवंतराव धोटे यांनी दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. काँग्रेसचे दत्ता मेघे, विलास मुत्तेमवार यांच्यासह भाजपच्या बनवारीलाल पुरोहित आणि नितीन गडकरी यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. २००४ च्या निवडणुकीत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला विदर्भ ढासळला. मात्र, विलास मुत्तेमवार यांच्या रुपात नागपूरची एकमेव जागा काँग्रेसने जिंकली होती.

 

टॅग्स :Electionनिवडणूक