शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

नागपूर- अमरावती महामार्गावरील सातनवरीत पेपर मिलला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 10:25 IST

नागपूर - अमरावती महामार्गावर असलेल्या सातनवरी शिवरातील इंड्स पेपर मिलला रविवारी दुपारी २.१५ च्या सुमारास आग लागली. त्यात कंपनीच्या आवारात ठेवण्यात आलेला कोट्यवधी रुपये किमतीचा आयातीत माल जळून राख झाला.

ठळक मुद्देकोट्यवधी रुपयांचे नुकसान आयातीत मालाची राख

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर - अमरावती महामार्गावर असलेल्या सातनवरी शिवरातील इंड्स पेपर मिलला रविवारी दुपारी २.१५ च्या सुमारास आग लागली. त्यात कंपनीच्या आवारात ठेवण्यात आलेला कोट्यवधी रुपये किमतीचा आयातीत माल जळून राख झाला. सुदैवाने या आगीत कोणत्याही कर्मचारी अथवा कामगाराला दुखापत झाली नाही. आगीचे कारण अस्पष्ट असले तरी आग विझविण्याचे कार्य रात्री उशिरापर्यंत सुरूच होते.सातनवरी शिवारातील इंड्स पेपर मिलमध्ये ‘टिशू पेपर, किचन टॉवेल व टॉयलेट’चे उत्पादन केले जाते. त्यासाठी लागणारा कच्चा माल हा अमेरिका व युरोपियन राष्ट्रांमधून आयात केला जातो. मिल ओशीगाम ग्रुपच्या मालकीची आहे. या कच्च्या मालाचे बंडल कंपनीच्या गोदाम आणि आवारात साठवून ठेवले होते. दरम्यान, दुपारी २.१५ च्या सुमारास आवारात ठेवण्यात आलेल्या पेपरच्या बंडलने पेट घेतला आणि ही आग अल्पावधीतच पसरत गेली.ही आग सुरक्षा कर्मचारी नीलेश मडके यांच्या लक्षात येताच त्यांनी लगेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देत आग विझविण्यासाठी आवारातील फायर पॉर्इंट सुरू करून आगीवर पाण्याचा मारा करायला सुरुवात केली. आग नियंत्रणात येत नसल्याचे लक्षात येताच नजीकच्या सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीतील अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. त्यानंतर हिंगणा एमआयडीसी, कळमेश्वर नगर परिषद व नागपूर महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या चार गाड्या ही आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होत्या. मात्र, आग नियंत्रणात आली नाही.

२०० कामगार व कर्मचारी सुरक्षितया कंपनीतील सकाळची पाळी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत असते. या पाळीत कंपनीमध्ये एकूण २०० कामगार व कर्मचारी कर्तव्यावर होते. त्यात महिला कामगारांचाही समावेश होता. कंपनीच्या आवारात आग लागल्याचे लक्षात येताच सर्व कामगार व कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या कार्यात कामगार आतातायीपणा करणार नाही, याचीही विशेष काळजी घेण्यात आली. त्यामुळे कुणालाही इजा झाली नाही.

आवारात २,५०० टन मालया कंपनीच्या आवारात २,५०० टन कच्चा माल ठेवला होता. तो सर्व परदेशातून आयात केला होता. या मालाची किंमत प्रति टन ३५ हजार रुपये आहे. आगीत नेमके किती रुपयांचे नुकसान झाले, हे आग विझल्यानंतर स्पष्ट होईल, अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापक विजय शर्मा यांनी दिली. या कंपनीत रोज ४० टन कागदाचे उत्पादन केले जाते, अशी माहिती कंपनीचे मार्केटिंग अधिकारी प्रशांत जोशी यांनी दिली.

अग्निशमन दलाचा जवान जखमीहिंगणा एमआयडीसी अग्निशमन दलाचा जवान सचिन उकरे हा आग विझविण्याचे कार्य करीत होता. त्यातच पाण्याच्या दाबामुळे नोझल व पाईप त्याच्या हातातून सुटला. त्यात त्याच्या हाताला दुखापत झाली. या ठिकाणी कळमेश्वर ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सुनील काबडी व शुभांगी ढगे यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. शिवाय, एक रुग्णवाहिकाही उपलब्ध करून देण्यात आली.

टॅग्स :fireआग