शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

नागपूर विमानतळ ३६ कोटी महसुलात ‘जीएमआर’ला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2019 6:44 AM

नागपूरचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबादच्या जीएमआर एअरपोर्ट डेव्हलपर्सला १४.४९ टक्के महसूल वाटप तत्वावर ३० वर्षाकरिता संचालन व विकास करण्यासाठी मिळाले आहे.

नागपूर : नागपूरचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबादच्या जीएमआर एअरपोर्ट डेव्हलपर्सला १४.४९ टक्के महसूल वाटप तत्वावर ३० वर्षाकरिता संचालन व विकास करण्यासाठी मिळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर मेट्रो रेल्वेच्या उद्घाटनप्रसंगी ही घोषणा केली. नागपूर विमानतळाचा वार्षिक महसूल २५० कोटी आहे, हे पाहता १४.४९ टक्क्याचा वाटा वर्षाला ३६ कोटी येतो. नागपूर विमानतळाला दरवर्षी २० कोटी नफा होत असूनही विमानतळ स्वस्तात जीएमआरला मिळाले आहे.विमानतळासोबत जीएमआरला एक नवीन टर्मिनल इमारत, ४००० मीटर्सचा रनवे व टॅक्सी वे, २०,००० टन क्षमतेची माल वखार, विमानाच्या पार्र्किंग लेन, एटीसी टॉवर व फायर स्टेशन उभे करायचे आहे, त्याचा खर्च १६८५ कोटी आहे. त्यानंतर विमानतळातून मिळणाऱ्या महसुलातून फक्त १४.४९ टक्केमिहान इंडिया लिमिटेडला द्यायचे आहेत. जीएमआरला सिटी साइट डेव्हलपमेंटसाठी २५० एकर जमीन मोफत मिळणार आहे, त्यावर जीएमआर व्यापारी संकुल, शॉपिंग मॉल, कन्व्हेन्शन सेंटर, पंचतारांकित हॉटेल्स क्लब हाऊस, करमणूक क्षेत्र, फूड प्लाझा इत्यादी उभे करेल. त्यांचा महसूलही जीएमआरला मिळेल.काल मिशन इंडिया लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. यापूर्वी मुंबई विमानतळ ४० टक्के महसूल वाटप तत्वाने जीव्हीके एअरपोर्टला मिळाले आहे तर दिल्लीचे विमानतळ जीएमआरनेच ४७ टक्के महसूल वाटप तत्वाावर ३० वर्षांसाठी घेतले आहे. नागपूर विमानतळ मात्र १४.४९ टक्के महसूल वाटपाने, स्वस्त किमतीत गेले आहे. मुंबई विमानतळासाठी जीव्हीकेने एअरपोर्टस् अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया व विदेशी कंपन्यांना भागीदारीत घेतले होते. दिल्ली विमानतळासाठीही जीएमआरने एएआयसह विदेशी कंपन्यांशी भागीदारी केली. पण नागपूर विमानतळासाठी जीएमआरने एएआय व विदेशी कंपन्यांना डावलले आहे. हेही संशयास्पद आहे.यावर खुलासा करण्यासाठी लोकमतने एमएडीसीचे उपाध्यक्षव प्रबंध संचालक सुरेश काकाणी, एमआयएलचे कंपनी सेक्रेटरी ववित्त अधिकारी रंजन ठाकूर यांच्याशी प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही. जीएमआरला ई-मेलद्वारा पाठवलेल्या प्रश्नावलीचेही उत्तर मिळाले नाही.>लोकमतचा दणकानागपूर विमानतळाच्या खासगीकरणाची निविदा सप्टेंबर २०१८ मध्ये आली, तेव्हा जीव्हीकेने ३.०६ टक्के महसूल देण्याची तयारी दाखवली तर जीएमआरने ५.७६ टक्के. यानंतर लोकमतने हे प्रकरण लावून धरल्याने जीएमआरने बोली १४.४९ टक्क्यांवर वाढवली. परंतु नागपूर विमानतळासाठी २५ ते ३० टक्के महसूल वाटा मिळायला हवा होता असे एमआयएलमधील काही सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :MONEYपैसा