नागपुरात अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 20:37 IST2019-06-13T20:33:22+5:302019-06-13T20:37:10+5:30
दहावीचा निकाल लागण्यापूर्वीच १ जूनपासून अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली होती. पहिल्या टप्प्यात अर्ज क्रमांक -१ आणि दुसऱ्या टप्प्यात अर्ज क्रमांक २ भरायचे होते. आतापर्यंत २० हजार २२२ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांना शाळेत तर सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी १९ केंद्रे बनविण्यात आली आहेत. यावर्षी नागपूर विभागाचा दहावीचा निकालात १८ टक्क्याची घट झाल्याने अकरावीच्या प्रवेशावर रिक्त जागेचे संक ट ओढवणार आहे. यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडण्याची चिन्हे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

नागपुरात अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दहावीचा निकाल लागण्यापूर्वीच १ जूनपासून अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली होती. पहिल्या टप्प्यात अर्ज क्रमांक -१ आणि दुसऱ्या टप्प्यात अर्ज क्रमांक २ भरायचे होते. आतापर्यंत २० हजार २२२ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांना शाळेत तर सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी १९ केंद्रे बनविण्यात आली आहेत. यावर्षी नागपूर विभागाचा दहावीचा निकालात १८ टक्क्याची घट झाल्याने अकरावीच्या प्रवेशावर रिक्त जागेचे संक ट ओढवणार आहे. यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडण्याची चिन्हे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
दोन वर्षांपासून शिक्षण विभागाद्वारे निकालापूर्वीच ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यंदा १ जूनपासून प्रक्रियेला सुरुवात झाली. मात्र पालक निकालाची वाट बघत राहिले. त्यामुळे गेल्या १० दिवसात २०,२२२ विद्यार्थ्यांनीच अर्ज केले. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी नोंदणीच्या प्रक्रियेला उशिरा सुरुवात झाली. गेल्यावर्षी विविध ज्युनि. कॉलेजमध्ये ५४,२३० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया घेण्यात आली होती. परंतु शेवटच्या टप्प्यात १७,६१९ जागा रिक्त राहिल्या होत्या.
यंदा बोर्डाचा निकाल घसरल्याने ९० टक्के प्रवेश घेणाऱ्यांची संख्या घटली आहे, तर सीबीएसई व आयसीएसई बोर्डाचे विद्यार्थी जास्त आहेत. त्यामुळे शहरातील नामांकित महाविद्यालयांमध्ये बायोफोकलच्या सीट मेरिटच्या हिशेबाने सीबीएसई विद्यार्थ्यांना मिळणार असल्याने त्यांचा दबदबा राहणार आहे.
सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचे इंटर्नल गुण कमी करणार
यावर्षी स्टेट बोर्डाचा निकाल कमी लागला. कारण तोंडी परीक्षेचे गुण बोर्डाने बंद केले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची टक्केवारी घसरली. मात्र सीबीएसई व आयसीएसई बोर्डाने विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेत गुण दिले. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत वाढ झाली. सूत्रांच्या मते, मेरिट सूची तयार करताना सीबीएसई व आयसीएसईच्या विद्यार्थ्यांचे तोंडी परीक्षेचे गुण ग्राह्य धरण्यात येणार नाही.
प्रवेश प्रक्रिया अडली
सूत्रांनी सांगितल्यानुसार, शिक्षण विभागाने सीबीएसई व आयसीएसई बोर्डाला पत्र लिहिले आहे. यात तोंडी व लेखी परीक्षेचे गुण वेगवेगळे देण्यास सांगितले आहे. मात्र शिक्षण विभागाला दोन्ही बोर्डाकडून उत्तर मिळाले नाही. त्यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया अडली असल्याचे सांगण्यात येत आहे.