शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur Accident : राजस्थानमध्ये भीषण अपघात; खाटू श्याम बाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या नागपूरच्या कुटुंबातील तिघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 17:17 IST

Nagpur : राजस्थानमधील सालासर रोडवर झालेल्या भीषण अपघातात महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील एका कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्ककामठी:राजस्थान येथील रिंगस परिसरातील खाटु श्यामबाबा मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या कामठी येथील पारसे कुटुंबावर काळाने भीषण घाला घातला. सालासर रोड येथे झालेल्या भीषण अपघातात आई-वडील व मुलाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कचरीपुरा (कामठी) येथील महादेव ऋषी पारसे (५२) हे ६ मार्च रोजी त्यांच्या घराशेजारी राहणारे मनोज चिंदमवार (३५) यांच्या मालकीच्या तवेरा गाडी (एमएच २८ व्ही ५२३४) ने कुटुंबीयांसह देवदर्शनासाठी रवाना झाले होते. त्यांच्या सोबत पत्नी कांता महादेव पारसे (४५), मुलगा घनश्याम महादेव पारसे (२२), पुतणी आराधना चंद्रभान पारसे (२६), पायल शंकर पारसे (२२), पल्लवी चंद्रभान पारसे (२१), पूनम यादव पारसे (२०), तुषार महादेव पारसे (२४) आणि पवन बागडे (२२), असे एकूण दहा जण होते.

सर्व जण ६ मार्च रोजी मध्यरात्री सुमारे बारा वाजता कामठीतून निघाले होते. प्रवासादरम्यान त्यांनी उज्जैन येथील महाकालेश्वर येथे दर्शन घेतले. त्यानंतर बुधवारी ११ मार्च रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजताच्या सुमारास ते राजस्थानातील रिंगस येथे खाटू श्यामबाबा मंदिरात दर्शनासाठी जात असताना जयपूर मार्गावरील सालासर परिसरात त्यांच्या तवेरा वाहनाला विरुद्ध दिशेने येणाऱ्या अनियंत्रित पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत तवेरा वाहनातील सर्वजण गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ सर्वांना सालासर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 

मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर महादेव ऋषी पारसे, त्यांची पत्नी कांता महादेव पारसे आणि मुलगा घनश्याम महादेव पारसे यांना मृत घोषित केले. वाहन चालक मनोज चिंदमवार यांच्यासह पारसे कुटुंबातील सहा जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची माहिती बुधवार रात्री सुमारे आठ वाजता कामठी येथे पोहोचताच कचरीपुरा परिसरात शोककळा पसरली. यानंतर महादेव पारसे यांचे नातेवाईक व सुरादेवी येथील माजी सरपंच सुनील दुधपचारे हे तातडीने सालासर रोडकडे रवाना झाले. तिघांच्या मृतदेहांवर शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येत असून, त्यानंतर मृतदेह कामठी येथे त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येणार आहेत. तसेच इतर सर्व जखमींनाही रुग्णवाहिकेद्वारे कामठी येथे आणण्यात येणार असल्याची माहिती गुलाब पारसे यांनी दिली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur Family's Rajasthan Accident: Three Dead En Route to Temple

Web Summary : A Nagpur family traveling to Rajasthan's Khatu Shyam temple met with tragedy. Three family members died in a collision. Six others were injured and are receiving treatment. The accident occurred on the Salasar Road, leaving the Kamthi area in mourning. Police are investigating.
टॅग्स :AccidentअपघातnagpurनागपूरRajasthanराजस्थान