Nagpur: ट्रकची धडक, ६५ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
By दयानंद पाईकराव | Updated: December 23, 2023 15:24 IST2023-12-23T15:23:17+5:302023-12-23T15:24:01+5:30
Nagpur Accident News: भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे एका ६५ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास घडली.

Nagpur: ट्रकची धडक, ६५ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
- दयानंद पाईकराव
नागपूर - भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे एका ६५ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास घडली.
बाळकृष्णा नारायण करडभाजने (वय ६५, रा. गवंडीपूरा, जुना सक्करदरा) असे अपघातात मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. बाळकृष्णा यांच्या घराचे बांधकाम खरबी येथे सुरु होते. बांधकामावर लक्ष देण्यासाठी ते सायकलने ये-जा करीत होते. गुरुवारी रात्री नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत खरबी रिंग रोड चौकात ते सायकलने जात असताना ट्रक क्रमांक एम. एच. ४०, सी. एम-५०२२ च्या ट्रक चालकाने आपल्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून त्यांच्या सायकलला धडक दिली. यात ते खाली पडून गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी मेडीकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तपासुन मृत घोषीत केले. याप्रकरणी त्यांचा मुलगा चक्रधर बाळकृष्णा करडभाजने (वय ३४) यांनी दिलेल्या तकरीवरून नंदनवन पोलिसांनी आरोपी ट्रक चालकाविरूध्द कलम २७९, ३३८, ३०४ (अ) नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.