शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

नागपुरात मेट्रो रेल्वेचे ‘जॉय राईड’ मार्चमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 00:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेट्रो रेल्वेचे ‘जॉय राईड’ अर्थात व्यावसायिक रन मार्चमध्ये सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्र  मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी येथे दिली.खापरी मेट्रो स्टेशन आणि डबलडेकर पुलाच्या पाहणी दौऱ्यानंतर दीक्षित यांनी सिव्हिल लाईन्स येथील मेट्रो हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधला.दीक्षित म्हणाले, कमिश्नर आॅफ मेट्रो रेल्वे ...

ठळक मुद्देबृजेश दीक्षित : डबलडेकर पुलाच्या डिझाईनमुळे बचत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेट्रो रेल्वेचे ‘जॉय राईड’ अर्थात व्यावसायिक रन मार्चमध्ये सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्र  मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी येथे दिली.खापरी मेट्रो स्टेशन आणि डबलडेकर पुलाच्या पाहणी दौऱ्यानंतर दीक्षित यांनी सिव्हिल लाईन्स येथील मेट्रो हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधला.दीक्षित म्हणाले, कमिश्नर आॅफ मेट्रो रेल्वे सेफ्टीच्या चमूने नागपूर मेट्रो रेल्वेचे अ‍ॅटग्रेड सेक्शन आणि मिहान डेपोची पाहणी केली. चमूने अहवाल रेल्वे बोर्डाकडे सोपविला आहे. ही चमू दुसऱ्यांदा नागपुरात येणार असून सिग्नल, ट्रॅक आणि अन्य संबंधित पैलूंची तपासणी करणार आहे. हिरवी झेंडी मिळाल्यानंतर मार्चमध्ये जॉय राईड सुरू होईल. याकरिता प्रवासभाडे महाराष्ट्र सरकारतर्फे जानेवारी २०१४ मध्ये जारी केलेल्या संबंधित जीआरनुसार आणि दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या धर्तीवर निश्चित करण्यात येणार आहे.रिच-१ चे बांधकाम नोव्हेंबरपर्यंतखापरी ते सीताबर्डीपर्यंत ‘रिच-१’चे बांधकाम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल. खापरी मेट्रो स्टेशनचे बांधकाम व्हिक्टोरिया प्रकारात करण्यात येत आहे. प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा आणि दिव्यांग व वयस्कांसाठी विशेष सुविधा राहील.दीक्षित म्हणाले, वर्धा रोडवर बांधण्यात येणाऱ्या डबलडेकर पुलाच्या डिझाईनमुळे २० टक्के आर्थिक बचत झाली आहे. हा पूल मनीषनगरच्या आरओबीला जोडला जाईल. याकरिता रिब अ‍ॅण्ड स्पाईन तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. खापरी, न्यू एअरपोर्ट, साऊथ एअरपोर्ट मेट्रो स्टेशनचे संचालन सोलर ऊर्जेवर करण्यासाठी ‘रेस्को’ मॉडेलवर संबंधित कंपनी गुंतवणूक करून सोलर उपकरण लावून त्याचे संचालन करणाार आहे. सोलर एनर्जी कॉर्पोरेशन आॅफ इंडियाद्वारे निश्चित केलेल्या दरानुसार महामेट्रो प्रति युनिट सोलर एनर्जीचे भुगतान संबंधित कंपनी करणार आहे.क्रेझी कॅसलची जमीन मेट्रो रेल्वेचीदीक्षित म्हणाले, मेट्रो स्टेशनच्या बांधकामाच्या दृष्टीने अंबाझरी येथील खासगी जमिनीचा प्रश्न निकाली निघाला आहे. आता क्रेझी कॅसलची जमीन महामेट्रोची होईल आणि क्रेझी कॅसलही राहील. महामेट्रोने विविध कार्यांसाठी प्रस्ताव दिले आहेत.पत्रपरिषदेत वित्तीय संचालक एस. शिवमाथन आणि महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे उपस्थित होते.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर