शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

नगर पालिकाही  आपल्या दारी,  सावनेरात उपक्रम, मोबाईल व्हॅनद्वारे मिळेल नागरिकांना सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 6:23 PM

सर्वसामान्य व्यक्तीला छोट्या-छोट्या कामासाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. मात्र बऱ्याचदा काम न झाल्याने त्यांना आल्या पावली परतावे लागते. ही बाब लक्षात येताच शासनाने  शासन आपल्या दारी  हा उपक्रम राबवून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. याच धर्तीवर सावनेर नगर परिषदेनेही नगरपरिषद आपल्या दारी  हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला.

गणेश खवसे नागपूर, दि. 22 - सर्वसामान्य व्यक्तीला छोट्या-छोट्या कामासाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. मात्र बऱ्याचदा काम न झाल्याने त्यांना आल्या पावली परतावे लागते. ही बाब लक्षात येताच शासनाने  शासन आपल्या दारी  हा उपक्रम राबवून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. याच धर्तीवर सावनेर नगर परिषदेनेही नगरपरिषद आपल्या दारी  हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या उपक्रमाची सुरुवात झाली. नगर पालिकेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.यानिमित्त आयोजित छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष रेखा मोवाडे होत्या. नगर परिषद उपाध्यक्ष अ‍ॅड. अरविंद लोधी, मुख्याधिकारी संघमित्रा ढोके, बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. चंद्रशेखर बरेठिया, डॉ. विजय धोटे, आनंदराव बागडे, रामराव मोवाडे, बांधकाम सभापती तुषार उमाटे, महिला व बाल कल्याण समिती सभापती नलिनी नारेकर, शिक्षण सभापती तेजस्विनी लाड, पाणीपुरवठा सभापती वनिता घुगल यांची प्रमुख उपस्थिती होती. आॅन स्पॉट  काय मिळणार?या उपक्रमात एका मोबाईल व्हॅनमध्ये संगणक तसेच इतर आवश्यक साहित्य, कागदपत्रे ठेवण्यात आली आहे. ही व्हॅन म्हणजे एकप्रकारचे फिरते कार्यालय असून त्यात पालिकेचे कर्मचारीसुद्धा राहणार आहे. ही व्हॅन सावनेरातील प्रत्येक गल्लीबोळात जाईल, त्यात झोपडपट्टीचाही समावेश आहे. एखाद्याने मोबाईलवर सूचना केली की लगेच ही व्हॅन संबंधित व्यक्तीच्या घरापर्यंत जाईल. त्याला आवश्यक अर्जाची परिपूर्ती करताच त्याला दस्तावेज, प्रमाणपत्र देण्यात येईल. यामध्ये जन्माचा दाखला, मृत्यूचा दाखला, कर भरणा, अर्ज तयार करून घेणे यासोबतच इतरही विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांच्या पैशांची, वेळेची आणि परिश्रमाची बचत होणार आहे. कार्यालयीन कामकाजावर जाणाºयांसह मजुरीवर जाणाºयांनाही आपल्या कामात अडथळा येणार नाही. सोबतच दलाल आणि इतर भानगडीचा सामना करावा लागणार नाही.जनतेच्या सुविधेसाठी तत्पर नगर परिषद आपल्या दारी  या उपक्रमाद्वारे नगर परिषद प्रशासन जनतेच्या सेवेत असणार आहे. बऱ्याचदा पालिकेचे उंबरठे झिजवूनही कामे होत नसल्याची नागरिकांची ओरड असते. त्यामुळे आता  आॅन स्पॉट  समस्या निकाली काढण्याचा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे. याद्वारे प्रमाणपत्र, दस्तावेज देण्यासोबतच नाली अस्वच्छता, रस्ता डागडुजी, कचरा उचलला जात नाही या आणि अशाप्रकारच्या समस्या तत्काळ मार्गी लावणार आहे. यासाठी व्हॅनमध्ये सर्वच विभागांचे विभागप्रमुख राहतील. ज्या प्रभागात जाणार त्या प्रभागाचे नगरसेवकही आमच्या सोबतीला राहणार आहेत. सध्या प्रभागनिहाय आम्ही रूपरेषा तयार केली आहे. जनतेला चांगली सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे.- संघमित्रा ढोके,मुख्याधिकारी, नगर परिषद सावनेर.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार