शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

नागनदीला नवसंजीवनी

By admin | Updated: April 19, 2017 02:32 IST

उपराजधानीच्या भरभराटीत नाग नदीचे महत्त्वाचे योगदान आहे. शहराचा हा ऐतिहासिक वारसा जपला जावा,

१२५२.३२ कोटींचा प्रकल्प : केंद्र सरकाची लवकरच मंजुरी नागपूर : उपराजधानीच्या भरभराटीत नाग नदीचे महत्त्वाचे योगदान आहे. शहराचा हा ऐतिहासिक वारसा जपला जावा, यासाठी महापालिकेने १५५८.९९ कोटींचा नागनदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा प्रस्ताव आठ महिन्यांपूर्वी केंद्र सरकारकडे पाठविला आहे. पर्यावरण मंत्रालयाने १२५२.३२ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरीही दिली. हा प्रकल्प मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पामुळे नागनदीला नवसंजीवनी मिळणार आहे. विशेष म्हणजे नागनदी पुनरुज्जीवन प्रकल्प अहवाल २०११ मध्ये राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालय (एनआरडीसी) यांच्याकडे पाठविला होता. तीन वर्षानतंर आॅगस्ट २०१४ मध्ये आयआयटी रुडकीच्या तज्ज्ञांनी नागनदीची पाहणी करून अहवाल सादर केला होता. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार प्रकल्प आराखड्यात काही बदल करून सुधारित प्रस्ताव सादर केला होता. नागपूर महापालिकेने पुणे महापालिकेच्या धर्तीवर या प्रकल्पासाठी ८५ टक्के निधी केंद्र सरकार व १५ टक्के निधी महापालिकेने खर्च करण्याची तयारी दर्शविली होती. जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी (जायका) यांनी या प्रकल्पासाठी ८५ टक्के निधी कर्ज स्वरुपात देण्याची तयारी दर्शविली होती. या प्रकल्पाला लवकरच मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. प्रकल्पामुळे नागनदीचा कायापालट होणार आहे.(प्रतिनिधी) नदीत येणारे सांडपाणी रोखणार नागनदीत प्रक्रिया न करताच सांडपाणी सोडण्यात येते. तसेच कारखान्यातील दूषित पाण्यावर प्रक्रिया न करता नदीपात्रात सोडण्यात येते. दूषित पाणी रोखण्यासाठी नदीपात्रात ट्रंक लाईन टाकण्यात येणार आहे. या लाईनला सिवेज लाईन जोडण्यात येणार आहे. याबाबतचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच नदीचा नैसर्गिक प्रवाह कायम सुरू राहावा. यादृष्टीने योजना राबविण्यात येणार आहे. नदीत कचरा टाकण्याला प्रतिबंध सांडपाण्यासोबतच नदीपात्रात मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. निरुपयोगी बांधकाम साहित्य, जैविक कचऱ्याचाही समावेश असतो. यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात कचरा व गाळ साचला आहे. कचरा टाकण्याला आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे.