शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
2
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
3
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
4
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
5
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
6
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
7
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
8
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
9
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
10
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
11
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
12
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
13
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
14
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
15
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
16
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
17
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
18
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
20
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईन फ्लूने निरीक्षकाच्या मृत्यूमुळे एनएडीटीचा सोहळा रद्द

By admin | Updated: February 20, 2015 02:14 IST

स्वाईन फ्लूची दहशत किती असू शकते याचा अंदाज २० दिवसांपूर्वी घडलेल्या एका घटनेतून समोर आले. राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीला (एनएडीटी) ...

नागपूर : स्वाईन फ्लूची दहशत किती असू शकते याचा अंदाज २० दिवसांपूर्वी घडलेल्या एका घटनेतून समोर आले. राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीला (एनएडीटी) आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्याचा मृत्यू स्वाईन फ्लूने झाल्याचे समजताच, महत्त्वपूर्ण सोहळा अनिश्चित काळासाठी रद्द केला.एनएटीडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा एक निरीक्षक स्वाईन फ्लू संशयित म्हणून रामदासपेठ येथील इस्पितळात उपचार घेत होता. २९ जानेवारी रोजी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विशेष म्हणजे, दुसऱ्याच दिवशी ३० जानेवारी रोजी एनएडीटीने आयआरएस प्रक्षिणार्थ्यांच्या ४३ व्या बॅचचा ‘ओरिएन्टेशन प्रोग्राम’ आयोजित केला होता. ज्यात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी), नवी दिल्लीतील काही सदस्यही सहभागी होणार होते. परंतु निरीक्षकाच्या मृत्यूची माहिती पसरताच, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वाईन फ्लूची शंका निर्माण केली. यामुळे एनएडीटी प्रशासन हरकतीत आले आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे ३० जानेवारी रोजी होणारा सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला. इतरांमध्ये स्वाईन फ्लू पसरण्याची शक्यता असल्याची कारणे देत, हा सोहळा रद्द करण्यात आला. एनएडीटीची ही शंका दोनच दिवसात खरी ठरली. निरीक्षकाचा स्वाईन फ्लूचा अहवाल पॉझिटिव्ह आला.निरीक्षकाच्या मृत्यूनंतर एनएडीटीने विशेषज्ञ डॉक्टरांची एक चमू तयार केली. कर्मचारी त्यांचे कुटुंब, आयआरएस प्रशिक्षणार्थ्यांची स्वाईन फ्लूच्या भीतीपोटी तपासणी सुरू केली. याच दरम्यान ६८ व्या बॅचमधील एका आयआरएस प्रशिक्षणार्थ्याचा स्वाईन फ्लूचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याला लगेच उपचारासाठी त्याच्या घरी हैदराबाद येथे पाठविले. सूत्रानुसार, या घटनेनंतर शहरातील आयकर विभागात स्वाईन फ्लू पसरण्याची भीती निर्माण झाली. विभागाने तत्काळ आपल्या स्टाफला तपासणीचे आदेश दिले. यादरम्यान सहायक आयुक्त स्तरावरील दोन अधिकाऱ्यांना स्वाईन फ्लू असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना उपचारासाठी सुटीवर पाठविण्यात आले. या प्रकरणात एनएडीटीच्या उच्च अधिकाऱ्यांशी संपर्क केल्यावर त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, स्वाईन फ्लूमुळे ४५ दिवसांपूर्वी एका जणाचा मृत्यू झाला. एक अन्य अधिकारीही पॉझिटिव्ह आला. परंतु वेळेवर उपचार घेतल्याने तो बरा झाला. खबरदारी म्हणून संपूर्ण अधिकारी, कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यात कुणालाच स्वाईन फ्लू नसल्याचे स्पष्ट झाले. स्वाईन फ्लूच्या भीतीमुळे कोणताही सोहळा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आलेला नाही. एनएडीटीचे कार्य सुरळीत सुरू आहे. यावर ‘लोकमत’ प्रतिनिधीने रद्द झालेल्या सोहळ्याविषयीची माहिती देत, आयआरएस प्रशिक्षणार्थ्यांची ४३ व्या बॅचचा रद्द झालेला सोहळा आणि ओरिएन्टेशन कोर्सचे आयोजन एनएडीटीमध्ये आज होऊ घातले आहे, असे सांगताच संबंधित अधिकारी स्तब्ध झाले. (प्रतिनिधी)