शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

‘माझी मेट्रो’ धावली रे ! पहिल्यांदा एलिव्हेटेड ट्रॅकवर ‘ट्रायल रन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 23:08 IST

‘ती येणार, ती धावणार’ या चर्चांनी मागील आठवडाभरापासून नागपुरकर उत्साहित होते. सोमवारी ‘ती’ केवळ आलीच नाही, तर शहरातून आपला ‘जलवा’ दाखवत आबालवृद्धांची मने जिंकत गेली. तिची एक ‘झलक’ मिळावी यासाठी कुणी गच्चीवर तर कुणी रस्त्यावरच उभे झाले आणि एक अनोखे ‘सरप्राईज’ हजारो नेत्रांनी ‘याची देही, याची डोळा’ अनुभवले. ज्या क्षणाची नागपूरकर आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण सोमवारी प्रत्यक्षात अनुभवता आला. एकीकडे ‘महा मेट्रो नागपूर’ने आपला चौथा वर्धापन दिन साजरा करत असताना ‘आरडीएसओ'च्या (संशोधन डिझाइन आणि मानक संघटना) परीक्षणात ‘मेट्रो कोचेस’ने पहिल्यांदाच ‘एलिव्हेटेड ट्रॅक'वर प्रवास केला.

ठळक मुद्देउपराजधानीच्या नागरिकांना ‘सरप्राईज’ : खापरी मेट्रो स्टेशन ते कॉंग्रेस नगर मेट्रो स्टेशन पर्यंत ‘रन’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘ती येणार, ती धावणार’ या चर्चांनी मागील आठवडाभरापासून नागपुरकर उत्साहित होते. सोमवारी ‘ती’ केवळ आलीच नाही, तर शहरातून आपला ‘जलवा’ दाखवत आबालवृद्धांची मने जिंकत गेली. तिची एक ‘झलक’ मिळावी यासाठी कुणी गच्चीवर तर कुणी रस्त्यावरच उभे झाले आणि एक अनोखे ‘सरप्राईज’ हजारो नेत्रांनी ‘याची देही, याची डोळा’ अनुभवले. ज्या क्षणाची नागपूरकर आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण सोमवारी प्रत्यक्षात अनुभवता आला. एकीकडे ‘महा मेट्रो नागपूर’ने आपला चौथा वर्धापन दिन साजरा करत असताना ‘आरडीएसओ'च्या (संशोधन डिझाइन आणि मानक संघटना) परीक्षणात ‘मेट्रो कोचेस’ने पहिल्यांदाच ‘एलिव्हेटेड ट्रॅक'वर प्रवास केला.‘आरडीएसओ'च्या परीक्षणासाठी वर्धा महामार्गावरील खापरी ते काँग्रेस नगर मेट्रो स्टेशन पर्यंतच्या ११.५ किमीचा प्रवास महामेट्रोने केला. यापैकी न्यू-एयरपोर्ट मेट्रो स्टेशन ते काँग्रेस नगर मेट्रो स्टेशनपर्यंत मेट्रोचा संपूर्ण ‘ट्रॅक’ हा ‘एलिव्हेटेड’ आहे. हे परीक्षण ‘आरडीएसओ’च्या अकरा सदस्यीय पथकाकडून करण्यात आले. याअंतर्गत ‘मेट्रो ट्रेन’च्या ‘ब्रेक’ प्रणालीसह सुरक्षासंबंधित तांत्रिक बाबींचे परीक्षण करण्यात आले. यात ‘एक्सीलरेशन’, ‘डीसीलरेशन’, ‘ऑस्सिलेशन’, ‘ट्रॅक’, ‘ओएचई’, पॉवर सप्लाय, ‘वायर टक्ट’ इत्यादींची चाचपणीदेखील करण्यात आली. परीक्षणासाठी ९०० नागरिक बसतील इतके वजन ‘कोचेस’मध्ये ठेवण्यात आले होते. तसेच पावसाळ्याच्या दिवसात ओल्या ‘ट्रॅक'वर ‘मेट्रो’ची ‘ब्रेक’ प्रणाली नियमित काम करेल याची खात्री करून घेण्यात आली. महत्वाचे म्हणजे गती तपासण्यासाठी १०, २० आणि ४५ किमी प्रति तास या वेगाने ‘मेट्रो’ चालविण्यात आली.‘ट्रायल रन’साठी हैदराबाद मेट्रोकडून मागविण्यात आलेल्या ‘ट्रेन’सोबतच चीनच्या ‘सीआरआरसी’ कंपनीकडून खरेदी करण्यात आलेल्या ‘मेट्रो’ची चाचणी करण्यात आली. तीन ‘कोच’ असणारी ‘मेट्रो’ मिहान ‘डेपो’तून निघून खापरी, न्यू एअरपोर्ट, साऊथ एअरपोर्ट स्टेशन या मार्गााने कॉंग्रेसनगर मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचली. दिवसभर हा ‘ऑसिलेशन ट्रायल रन’ चालला. यावेळी ‘महामेट्रो’चे कार्यकारी संचालक (रोलिंग स्टॉक) जनककुमार गर्ग, महाव्यवस्थापक (रोलिंग स्टॉक) नरेश गुरबानी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर