शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
अमेरिकेचे सैन्य, इराणचे महाकाय जहाज; होर्मुझ सामुद्रधुनी सहा तास संघर्ष आणि घेतले ताब्यात; व्हिडीओ पहा
3
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
4
इंधन-गॅसचा पुरवठा लवकरच सुरळीत होणार? शनिवारी २० जहाजांनी पार केले होर्मुझ...
5
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
6
सूट-बूट घालून आला, पाहुण्यांमध्ये मिसळला अन् ५ लाख घेऊन पळाला; Video पाहून बसेल धक्का
7
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
8
Latest Marathi News LIVE Updates: खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागण्या काय?
9
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
10
‘विकसित भारत संकल्पात पालघरचा सहभाग हवाच’ राज्यपालांच्या हस्ते डहाणूत आरोग्यसेवांचे लोकार्पण
11
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
12
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
13
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
14
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
15
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
16
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
18
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
19
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
20
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मुस्लिम लीग-राष्ट्रवादीची युती

By admin | Updated: January 15, 2017 16:10 IST

राष्ट्रवादी काँग्रेस व मुस्लिम लिगची युती झाल्याची घोषणा राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष माजी मंत्री अनिल देशमुख व मुस्लिम लिगचे शहर अध्यक्ष शमीम सादिक यांनी

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 15 -  राष्ट्रवादी काँग्रेस व मुस्लिम लिगची युती झाल्याची घोषणा राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष माजी मंत्री अनिल देशमुख व मुस्लिम लिगचे शहर अध्यक्ष शमीम सादिक यांनी रविवारी संयुक्त पत्रकार परिषदेत केली. आता रिपब्लिकन गटांनाही सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. देशमुख म्हणाले, कुणाला किती जागा द्यायच्या यावर आमची अद्याप चर्चा झाली नाही. यानंतर पुढील बैठकीत जागावाटप निश्चित केले जाईल. धर्मांध शक्तीविरोधात लढण्यासाठी सर्व धर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्र करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस हा आमचा मोठा भाऊ आहे. या लढ्यात काँग्रेसनेही सोबत यावे, अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे काँग्रेसनेही सकारात्मक विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. 

 मुस्लिम लिगचे शहर अध्यक्ष शमीम सादिक म्हणाले, महापालिकेची गेली निवडणूक लिगने स्वबळावर लढविली होती. आम्ही भाजपाला महापालिकेत समर्थन दिले नव्हते. मुस्लिम बहुल भागाचा विकास करण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. मात्र, गेल्या पाच वर्षात भाजपने विकास कामे केली नाहीत. भाजपने शब्द पाळला नाही. त्यामुळे या वेळी आम्ही धर्मनिरपेक्ष पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करीत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.  
काँग्रेसने आधी नेत्यांचे मनोमिलन करावे 
 राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतरही काँग्रेसने आघाडी नको, अशी भूमिका घेतली आहे. याबाबत विचारले असता आ. प्रकाश गजभिये म्हणाले, काँग्रेसशी आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते विलास मुत्तेमवार यांच्याघरी चर्चेसाठी गेले. काँग्रेसला आघाडीचा प्रस्ताव दिला. मात्र, दुसºयाच दिवशी काँग्रेसच्या इतर नेत्यांचे फोन आले. कोणताही एक नेता आघाडीचा निर्णय घेणार नाही. आमच्याशीही चर्चा करावी लागेल, असे त्या नेत्यांचे म्हणणे होते, असे गजभिये यांनी सांगितले. त्यामुळे  काँग्रेसने राष्ट्रवादीला नकार देण्यापेक्षा आधी आपल्या नेत्यांचे मनोमिलन करावे, असा चिमटा आ. प्रकाश गजभिये यांनी काढला.