नागपुरातील पाचपावलीत तरुणाचा खून : दगडाने ठेचून मारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 23:07 IST2021-05-28T22:36:39+5:302021-05-28T23:07:02+5:30

Murder of a youth , crime news पाचपावलीतील लष्करीबाग परिसरात एका तरुणाची काही गुंडांनी दगडाने ठेचून शुक्रवारी रात्री खून केला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Murder of a youth in Pachpavli, Nagpur: Stoned to death | नागपुरातील पाचपावलीत तरुणाचा खून : दगडाने ठेचून मारले

नागपुरातील पाचपावलीत तरुणाचा खून : दगडाने ठेचून मारले

ठळक मुद्देआरोपी फरार, परिसरात प्रचंड तणाव

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पाचपावलीतील लष्करीबाग परिसरात एका तरुणाची काही गुंडांनी दगडाने ठेचून शुक्रवारी रात्री खून केला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सूत्रांच्या माहितीनुसार, मृताचे नाव कपिल शशिकांत बेन (वय २०) असून, तो मोमीनपुऱ्या नजीकच्या योगा कंपनीजवळ राहत होता. गुरुवारी रात्री सातच्या सुमारास तो काही मित्रांसोबत लष्करीबाग परिसरात गेला होता. तेथे त्याचा काहीजणांसोबत वाद झाला. त्यानंतर आरोपींनी दगडाने ठेचून त्याचा खून केला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. घटनास्थळी मोठ्या संख्येत संतप्त जमाव जमला. त्यांचा रोष लक्षात घेता परिस्थिती बिघडू शकते, असा अंदाज आल्याने पाचपावली पोलिसांनी घटनास्थळी अतिरिक्त पोलीस कुमक मागवून घेतली. दरम्यान, या गुन्ह्याचे कारण स्पष्ट झाले नव्हते. घटनेची माहिती कळताच पाचपावलीचा पोलीस ताफा, पोलीस उपायुक्त लोहित मतानी, तसेच गुन्हे शाखेची पथके, दंगा प्रतिबंधक पथक घटनास्थळी पोहोचले संतप्त जमाव घोषणाबाजी करीत असल्याचे बघून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आरोपींची नावं आणि संख्या कळू शकली नाही.

ही घटना रात्री ९ वाजताची असून, मृत कपिल ढोल-बाजा पार्टीत वाजवण्याचे काम करीत होता. प्रेम प्रकरणातून ही घटना घडली असावी, असा पोलिसांना संशय आहे.

Web Title: Murder of a youth in Pachpavli, Nagpur: Stoned to death