नागपूरनजीक खापरीत युवकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 23:33 IST2020-05-27T23:32:03+5:302020-05-27T23:33:40+5:30

वर्धा रोडवरील खापरी येथे एका युवकाने साथीदाराची दगडाने ठेचून हत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Murder of a youth in Khapri near Nagpur | नागपूरनजीक खापरीत युवकाची हत्या

नागपूरनजीक खापरीत युवकाची हत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वर्धा रोडवरील खापरी येथे एका युवकाने साथीदाराची दगडाने ठेचून हत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सुनील सुशील यादव (३२) असे मृताचे नाव आहे. तर आरोपी शशांक माहुर्ले (३०) हा आहे.
सुनील कॉटन मार्केट परिसरात काम करीत होता. आरोपी शशांक माहुर्ले बेरोजगार आहे. सुनील दुपारी १ वाजता कामावरून घरी परत जात होता. रस्त्यात त्याची शशांकसोबत भेट झाली. दोघेही दारू पिण्यासाठी खापरी बाजारातील एका दुकानात गेले. दारू पिल्यानंतर दोघेही बाजाराजवळ बसले. कोरोनामुळे बाजार बंद आहे. त्यामुळे कुणाचे फारसे येणे-जाणेही नव्हते. दोघेही एका दुकानासमोर बसून चर्चा करीत होते. दरम्यान, त्यांच्यात वाद झाला. शशांकने रागाच्या भरात सुनीलचे डोके दगडाने ठेचले. त्याची हत्या करून तो फरार झाला. परिसरातील नागरिकांनी पोलिसांना सूचना दिली. सोनेगाव पोलिसांनी सुनीलला रुग्णालयात पोहोचवले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून शशांकला अटक केली. पाच दिवसात खुनाची ही तिसरी घटना आहे.

Web Title: Murder of a youth in Khapri near Nagpur