अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करून केली हत्या; आराेपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2022 22:54 IST2022-06-22T22:53:59+5:302022-06-22T22:54:41+5:30
Nagpur News एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करण्याची खळबळजनक घटना नागपूर जिल्ह्यातील मौदा येथे घडली आहे.

अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करून केली हत्या; आराेपी अटकेत
नागपूर : अल्पवयीन विद्यार्थिनी ट्यूशन क्लास आटाेपून घरी परत येत असताना तरुणाने तिला बळजबरीने माेटरसायकलवर बसवून साळवा (कुही) शिवारातील जंगलात नेले. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर रागाच्या भरात गळा व पाेटावर चाकूने वार करून तिची हत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. २१) घडली असून, बुधवारी (दि. २२) उघडकीस आल्याने पाेलिसांनी आराेपीस अटक केली आहे.
धीरज सुरेश शेंडे (१९, रा. भामेवाडा, ता. माैदा) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. मृत विद्यार्थिनी ही १५ वर्षीय असून, ती शिवाजीनगर, माैदा येथील रहिवासी आहे. ती माैदा शहरातील जनता हायस्कूलमध्ये इयत्ता दहाव्या वर्गात शिकायची. ती मंगळवारी सकाळी ८.१५ वाजताच्या सुमारास ट्यूशनला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली हाेती. सकाळी ११ वाजेपर्यंत घरी परत न आल्याने आई वडिलांनी तिची मैत्रिणींकडे चाैकशीही केली.
दरम्यान, ती क्लास आटाेपून धीरज शेंडेसाेबत माेटरसायकलवर गेल्याची माहिती काही मुलींनी तिच्या आईवडिलांनी दिली. ती रात्रीपर्यंत घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. त्याअनुषंगाने पाेलिसांनी बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास माैदा शहरातील शिवाजीनगर भागातून धीरजला ताब्यात घेत विचारपूस केली. त्यानंतर त्याने रात्री तिचा खून केल्याची माहिती पाेिलसांना देताच त्याला अटक केली. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी भादंवि ३६३, ३०२, २०१, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा २०१२ सहकलम ४, ६ अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.
प्रेमसंबंध असल्याचा संशय
तिचे दुसऱ्या मुलासाेबत प्रेमसंबंध असल्याचा संशय असल्याची माहिती आराेपी धीरजने पाेलिसांना दिली. याच संशयापाेटी त्याने तिला बळजबरीने माेटरसायकलवर बसून साळवा शिवारातील जंगलात नेले. सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर भांडण करीत चाकूने वार करून तिची हत्या केली. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने धीरजने तिचा मृतदेह जंगलात फेकून देत गावाच्या दिशेने पळ काढला हाेता.