धाकट्याने केला थाेरल्याचा खून : काेतवालबर्डी येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 00:09 IST2021-06-05T00:08:53+5:302021-06-05T00:09:38+5:30
Murder, crime news दारूचे व्यसन असलेला थाेरला भाऊ घरी भांडणे करायचा तसेच आई-वडिलांना शिवीगाळ करायचा. वारंवार घडलेल्या या प्रकाराला कंटाळून धाकट्याने थाेरल्याचा टी शर्टने गळा आवळून खून केला.

धाकट्याने केला थाेरल्याचा खून : काेतवालबर्डी येथील घटना
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : दारूचे व्यसन असलेला थाेरला भाऊ घरी भांडणे करायचा तसेच आई-वडिलांना शिवीगाळ करायचा. वारंवार घडलेल्या या प्रकाराला कंटाळून धाकट्याने थाेरल्याचा टी शर्टने गळा आवळून खून केला. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील काेतवालबर्डी येथे शुक्रवारी (दि. ४) रात्री ७.३० वाजताच्या सुमारास घडली असून, पाेलिसांनी आराेपीस ताब्यात घेतले हाेते.
चंद्रशेखर रामाजी बदखल (३४) असे मृताचे तर गणेश रामाजी बदखल (३२) असे आराेपीचे नाव आहे. ते दाेघेही अविवाहित असून, ते आई वडिलांसाेबत एकत्र काेतवालबर्डी, ता. कळमेश्वर येथे राहतात. चंद्रशेखर हा काेतवालबर्डी परिसरातील एका खासगी कंपनीमध्ये नाेकरी करायचा. शिवाय, त्याला दारूचे व्यसनही हाेते. तो दारू पिऊन घरी आल्यानंतर वयाेवृद्ध आई-वडिलांना विनाकारण शिवीगाळ, भांडणे करायचा. आई-वडिलांसह गणेशने त्याला अनेकदा समजावून सांगितले. परंतु, त्याच्या वर्तनात काहीही बदल झाला नाही, अशी माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली.
दरम्यान, शुक्रवारी रात्री घरी दारू पिऊन आला हाेता. त्याने शिवीगाळ करायला सुरुवात करताच दाेन्ही भावांमध्ये भांडण सुरू झाले. त्यातच गणेशने चंद्रशेखरच्या गळ्याभाेवती टी शर्ट गुंडाळले आणि जाेरात आवळले. यात चंद्रशेखरला श्वास घेणे अवघड झाल्याने काही वेळातच त्याचा घरीच मृत्यू झाला. ही बाब स्थानिकांना माहिती हाेताच त्यांनी पाेलिसांना कळविले. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून गणेशला ताब्यात घेत चंद्रशेखरचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. वृत्त लिहिस्ताे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेती. या घटनेचा तपास ठाणेदार आसिफ रजा शेख करीत आहेत.