त्या मृत मातेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 22:38 IST2019-08-03T22:36:19+5:302019-08-03T22:38:30+5:30

आपल्या १० महिन्यांच्या मुलीला तलावात फेकून स्वत:ही आत्महत्या करणा-या महिलेविरुद्ध गणेशपेठ पोलिसांनी ३९ दिवसांनंतर हत्येचा गुन्हा दाखल केला.

A murder case was filed against the deceased mother | त्या मृत मातेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

त्या मृत मातेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

ठळक मुद्देचिमुकल्या मुलीसह तलावात घेतली होती उडीजून महिन्यात घडली होती घटना : मृत मायलेकी वर्धा जिल्ह्यातील रहिवासी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपल्या १० महिन्यांच्या मुलीला तलावात फेकून स्वत:ही आत्महत्या करणा-या महिलेविरुद्ध गणेशपेठ पोलिसांनी ३९ दिवसांनंतर हत्येचा गुन्हा दाखल केला. सायली नितीन खावडे असे आरोपी मृत महिलेचे नाव आहे.
२४ जूनला सकाळी गांधीसागर तलावात एक महिला आणि १० महिन्यांच्या मुलीचा मृतदेह आढळला होता. गणेशपेठ पोलिसांनी चौकशी केली असता त्या महिलेचे नाव सायली दिलीपराव नेवारे उर्फ सायली नितीन खावडे आणि मुलीचे नाव माहेश्वरी नितीन खावडे असल्याचे उघड झाले. सायली सावंगी मेघे (जि. वर्धा) येथील रहिवासी होती. घरगुती कारणावरून वर्धेहून नागपुरात येऊन सायलीने मुलीसह आत्महत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले होते. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या चौकशीत सायलीने आत्महत्या करतानाच मुलीला पाण्यात फेकून तिची हत्या केली, असे स्पष्ट झाले. त्यामुळे गणेशपेठ पोलिसांनी या प्रकरणात आता सायलीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. सायलीचा आधीच मृत्यू झाल्यामुळे हा गुन्हा कागदोपत्री ठरला आहे.

Web Title: A murder case was filed against the deceased mother