मनपा आरोग्य अधिकारी डॉ.गंटावार दाम्पत्य निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 01:10 IST2020-06-27T01:08:30+5:302020-06-27T01:10:05+5:30
शासकीय सेवेत रुजू असताना खासगी रुग्णालय चालविणे. मनपा रुग्णालयात हजर न राहता स्वाक्षºया करून वेतन उचलणे. याप्रकरणी मनपाचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावर आणि त्यांची पत्नी वैद्यकीय अधिकारी शिलू गंटावार यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले.

मनपा आरोग्य अधिकारी डॉ.गंटावार दाम्पत्य निलंबित
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: शासकीय सेवेत रुजू असताना खासगी रुग्णालय चालविणे. मनपा रुग्णालयात हजर न राहता स्वाक्षºया करून वेतन उचलणे. याप्रकरणी मनपाचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावर आणि त्यांची पत्नी वैद्यकीय अधिकारी शिलू गंटावार यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले. तसेच इंदिरा गांधी रुग्णालयातील रेकॉर्ड ताब्यात घेण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी शुक्रवारी महासभेत दिले. तसेच उपद्रवी पथकातील कर्मचारी संदीप उपाध्याय या कर्मचाऱ्याने एका व्यक्तीला केलेल्या मारहाण प्रकरणी त्यांची सेवा समाप्त करण्याचे निर्देश दिले.
महापालिका सभागृहात गेल्या दोन दिवसापासून डॉ. गंटावार यांना निलंबित करून त्यांची चौकशी करण्याची मागणी सुरू आहे. दयाशंकर तिवारी, संदीप साहेब यांनी त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची माहिती सभागृहात दिली. गंटावार यांची यापूर्वी चौकशी करण्यात आली होती त्यांना दोषी ठरविण्यात आले होते. गंटावार दाम्पत्य मनपा सेवेत असताना खासगी रुग्णालय चालवत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.