शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मुंढे साहेब, महिलांचा सन्मान करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 8:47 PM

स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या सेक्रेटरी यांना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून अपमानास्पद वागणूक देऊन छळ करण्यात आला. त्यांना प्रसूती काळातील रजा नाकारण्यात आली. तसेच अन्य महिला अधिकाऱ्यांनाही मुंढे यांनी अपमानास्पद वागणूक दिली, असा अरोप करीत सत्ताधारी भाजपच्या महिला नगरसेविकांनी बुधवारी महापालिका मुख्यालयातील आयुक्तांच्या कक्षापुढे काळे मास्क व काळा वेश परिधान करून ठिय्या आंदोलन करीत ‘मुंढे साहेब, महिलांचा सन्मान करा!’ अशा आशयाचे फलक झळकावले.

ठळक मुद्देभाजप नगरसेविकांचे आयुक्तांच्या कक्षाबाहेर ठिय्या आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या सेक्रेटरी यांना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून अपमानास्पद वागणूक देऊन छळ करण्यात आला. त्यांना प्रसूती काळातील रजा नाकारण्यात आली. तसेच अन्य महिला अधिकाऱ्यांनाही मुंढे यांनी अपमानास्पद वागणूक दिली, असा अरोप करीत  सत्ताधारी भाजपच्या महिला नगरसेविकांनी बुधवारी महापालिका मुख्यालयातील आयुक्तांच्या कक्षापुढे काळे मास्क व काळा वेश परिधान करून ठिय्या आंदोलन करीत ‘मुंढे साहेब, महिलांचा सन्मान करा!’ अशा आशयाचे फलक झळकावले.  आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका कार्यालय परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या महिला सेक्रेटरी यांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे यासंदर्भात तक्रार केली आहे. याची दखल घेत आयोगाने आयुक्त मुंढे यांना नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले आहे. प्रसूती कालावधीत महिलांना रजा घेण्याचा अधिकार असतानाही मुंढे यांनी भानुप्रिया ठाकूर यांना रजा नाकारून त्यांना मानसिक त्रास दिला. महापालिकेत ५० टक्के महिला नगरसेविका आहेत. महिला कर्मचारी व अधिकाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आयुक्तांनी महिलांचा सन्मान करावा, अशी भूमिका उपमहापौर मनीषा कोठे व मनपातील सत्ता पक्षाच्या प्रतोद दिव्या धुरडे यांनी मांडली. आंदोलनात नगरसेविका प्रगती पाटील, वर्षा ठाकरे, रूपा रॉय, संगीता गिऱ्हे, रिता मुळे, उषा पॅलट यांच्यासह मोठ्या प्रमाणात नगरसेविका सहभागी झाल्या होत्या.नगरसेविका गुन्हेगार नाहीतलोकांनी आम्हाला निवडून दिले आहे. त्यांच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. महापालिका आयुक्तांकडून आम्हाला चांगली वागणूक मिळावी. आम्ही गुन्हेगार नाही, अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा नगरसेविकांनी यावेळी दिला.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेWomenमहिलाagitationआंदोलन