मुंबई डॉन अरुण गवळीला हवीय रजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 23:31 IST2018-07-13T23:29:40+5:302018-07-13T23:31:13+5:30

मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीने कुटुंबीयांना भेटण्यासाठी चार आठवड्यांची संचित रजा (फर्लो) मिळावी याकरिता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने कारागृह विभागाचे उपमहानिरीक्षक (पूर्व) यांना नोटीस बजावून यावर २३ आॅगस्टपर्यंत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला आहे.

Mumbai Don Arun Gawli wants furlough | मुंबई डॉन अरुण गवळीला हवीय रजा

मुंबई डॉन अरुण गवळीला हवीय रजा

ठळक मुद्देहायकोर्टात याचिका : कारागृह विभागाला नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीने कुटुंबीयांना भेटण्यासाठी चार आठवड्यांची संचित रजा (फर्लो) मिळावी याकरिता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने कारागृह विभागाचे उपमहानिरीक्षक (पूर्व) यांना नोटीस बजावून यावर २३ आॅगस्टपर्यंत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला आहे.
याचिकेवर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व अरुण उपाध्ये यांच्यासमक्ष सुनावणी झाली. गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. त्याला २० मे २००८ रोजी अटक करण्यात आली होती. सध्या त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. गवळीतर्फे अ‍ॅड. मीर नगमान अली यांनी बाजू मांडली.

Web Title: Mumbai Don Arun Gawli wants furlough