नागपूरच्या मध्यभागी साकारणार ‘मल्टी मॉडेल हब’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 10:53 AM2020-11-07T10:53:41+5:302020-11-07T10:55:54+5:30

Nagpur News Nitin Gaadkari Multi Model Hub उपराजधानीच्या मध्यभागी ‘मल्टी मॉडेल हब’ उभारण्याची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने पावले उचलण्यात आली आहेत.

'Multi Model Hub' to be set up in central Nagpur | नागपूरच्या मध्यभागी साकारणार ‘मल्टी मॉडेल हब’

नागपूरच्या मध्यभागी साकारणार ‘मल्टी मॉडेल हब’

Next
ठळक मुद्देमध्यवर्ती कारागृह, भारतीय खाद्य महामंडळ स्थानांतरित होणार‘एनएचएआय’ उचलणार खर्च

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : उपराजधानीच्या मध्यभागी ‘मल्टी मॉडेल हब’ उभारण्याची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने पावले उचलण्यात आली आहेत. यासाठी मध्यवर्ती कारागृह तसेच भारतीय खाद्य महामंडळाच्या गोदामाला रिंग रोडवर स्थानांतरित करण्यात येईल. या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च ‘एनएचएआय’कडून (नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया) उचलण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

गडकरी यांनी शुक्रवारी संपादकांशी चर्चा करताना ही माहिती दिली. ‘मल्टी मॉडेल हब’मध्ये रेल्वे, बस व मेट्रो या वाहतूकसेवांना एकाच छताखाली आणले जाईल. अजनी रेल्वेस्थानकालादेखील याच्याशी जोडण्यात येईल. यासोबतच तेथे अत्याधुनिक मार्केट व कार्यालयेदेखील असतील. सर्व सुविधा असलेले हे ‘हब’ शहराचा गौरव बनेल. यासाठी मध्यवर्ती कारागृह तसेच भारतीय खाद्य महामंडळाच्या गोदामांची जागा देण्यात येईल. दोघांनाही रिंग रोडवर स्थानांतरित करण्यात येईल. या प्रक्रियेत मध्यवर्ती कारागृहावर कुठलेही आर्थिक ओझे येणार नाही. ‘मल्टी मॉडेल हब’ विकसित करणारी एजन्सी ‘एनएचएआय’ हीच नवीन कारागृहदेखील तयार करून देईल, असे गडकरी यांनी सांगितले.

गडचिरोलीत ‘ऑईल रिफायनरी’

बांबूपासून निघणाऱ्या ‘एव्हिएशन’ इंधनाचा उपयोग करून विमान वाहतुकीचा खर्च बऱ्याच अंशी कमी केला जाऊ शकतो. गडचिरोलीमध्ये बांबू मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. हे पाहता तेथे बांबू आधारित ‘ऑईल रिफायनरी’ तयार करण्याचा प्रस्ताव आहे. ही योजना गडचिरोलीसारख्या मागास भागाच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

Web Title: 'Multi Model Hub' to be set up in central Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.