अंबानींचे जावई पिरामल नागपुरात संघस्थानी

By योगेश पांडे | Published: June 10, 2024 07:12 PM2024-06-10T19:12:48+5:302024-06-10T19:13:31+5:30

नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर या वर्गाचा समारोप होत असून सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचे यावेळी उद्बोधन होणार आहे

Mukesh Ambani son in law Piramal at Sangh in Nagpur | अंबानींचे जावई पिरामल नागपुरात संघस्थानी

अंबानींचे जावई पिरामल नागपुरात संघस्थानी

नागपूर :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीयच्या समारोपप्रसंगी उद्योगपती मुकेश अंबानी यांचे जावई आनंद पिरामल हे पोहोचले आहेत. नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर या वर्गाचा समारोप होत असून सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचे यावेळी उद्बोधन होणार आहे. त्या सोहळ्यासाठी देशभरातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात येते. या अंतर्गतच यावर्षी पिरामल यांना बोलण्यात आले होते. पिरामल यांनी देखील निमंत्रणाचा स्वीकार करत नागपुरात येण्याची तयारी दाखवली. त्यांच्यासोबत अनेक गणमान्य व्यक्ती संघाच्या सोहळ्यात उपस्थित आहेत. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर संघाची नेमकी काय भूमिका आहे हे समोर आले नव्हते. देशातील सध्याच्या राजकीय तसेच सामाजिक स्थितीवर सरसंघचालक काय भाष्य करतात याकडे राजकीय व सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे. संघाच्या प्रक्रियेत प्रशिक्षण वर्गांना अनन्यसाधारण महत्त्व आहे विशिष्ट उन्हाळ्यात देशभरात विविध ठिकाणी वर्गांच्या आयोजन करण्यात येते. मात्र तृतीय वर्ष वर्गाचे केवळ नागपुरात आयोजित करण्यात येते. यावर्षीपासून या वर्गाचे नाव कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीय असे करण्यात आले आहे. या वर्गाच्या अभ्यासक्रमातदेखील यंदापासूनच बदलण्यात आला आहे. यात व्यावहारिक प्रशिक्षणाचा देखील समावेश करण्यात आला आहे.

Web Title: Mukesh Ambani son in law Piramal at Sangh in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.