शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
अमेरिकेचे सैन्य, इराणचे महाकाय जहाज; होर्मुझ सामुद्रधुनी सहा तास संघर्ष आणि घेतले ताब्यात; व्हिडीओ पहा
3
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
4
इंधन-गॅसचा पुरवठा लवकरच सुरळीत होणार? शनिवारी २० जहाजांनी पार केले होर्मुझ...
5
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
6
सूट-बूट घालून आला, पाहुण्यांमध्ये मिसळला अन् ५ लाख घेऊन पळाला; Video पाहून बसेल धक्का
7
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
8
Latest Marathi News LIVE Updates: खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागण्या काय?
9
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
10
‘विकसित भारत संकल्पात पालघरचा सहभाग हवाच’ राज्यपालांच्या हस्ते डहाणूत आरोग्यसेवांचे लोकार्पण
11
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
12
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
13
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
14
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
15
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
16
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
18
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
19
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
20
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
Daily Top 2Weekly Top 5

मिसेस सीएम मनोरुग्णालयात

By admin | Updated: July 2, 2014 01:00 IST

प्रादेशिक मनोरुग्णलयात मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता अचानक दस्तुरखुद्द मिसेस सीएम सत्त्वशीला चव्हाण यांनी भेट दिल्याने खळबळ उडाली. त्यांनी या भेटीत महिला वॉर्ड आणि पुरुष व महिलांच्या

महिला वॉर्ड आणि ओटीची केली पाहणी नागपूर : प्रादेशिक मनोरुग्णलयात मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता अचानक दस्तुरखुद्द मिसेस सीएम सत्त्वशीला चव्हाण यांनी भेट दिल्याने खळबळ उडाली. त्यांनी या भेटीत महिला वॉर्ड आणि पुरुष व महिलांच्या अ‍ॅक्युप्रेशर थेरपी विभागाची (ओटी) पाहणी केली. विशेषत: कॅन्सरपीडित मनोरुग्ण बिन्ना हिच्या प्रकृतीची चौकशी केली. मिसेस सीएम यांनी १४ जून रोजी अशीच अचानक मेडिकलला भेट दिली होती. तब्बल पावणेदोन तास त्यांनी अपघात विभागापासून ते विविध वॉर्ड, शस्त्रक्रिया कक्ष असे एकूण २० ठिकाणी भेटी दिल्या. रुग्णांशीही त्यांनी चर्चा केली. यावेळी स्वच्छतेविषयी विशेष काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी अधिष्ठात्यांना दिल्या होत्या. या भेटीनंतर मिसेस सीएम पुन्हा मेडिकलला येणार असल्याची चर्चा होती. परंतु आज अचानक सायंकाळी मनोरुग्णालयाला भेट दिल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलीच धावाधाव करावी लागली. मिसेस सीएम आल्या आल्या महिला वॉर्डाकडे वळल्या. तेथील वॉर्डाची स्थिती अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी महिलांच्या आणि नंतर पुरुषांच्या अ‍ॅक्युप्रेशर थेरपी विभागाची पाहणी केली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुलसीराम धोटे यांच्या कक्षात त्यांनी रुग्णालयाची माहिती घेतली. मिसेस सीएम यांनी रुग्णालयाच्या स्वच्छतेविषयी समाधान व्यक्त केले. या भेटीत त्यांच्यासोबत उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. पुरुषोत्तम मडावी, वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन गुल्हाने, डॉ. प्रवीण नवखरे आणि सामाजिक कार्यकर्त्या शबनम खान आदी उपस्थित होते.‘बिन्ना’ची केली आस्थेने चौकशीमिसेस सीएम यांनी आपल्या भेटीत कॅन्सरपीडित मनोरुग्ण असलेली बिन्नाची आस्थेने चौकशी केली. बिन्नाच्या आहाराकडे आणि औषधोपचाराकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी केल्या. (प्रतिनिधी)