खासदाराची साद; रेल्वेमंत्र्यांची दाद ! पत्र लिहून दिली खुशखबर : जनतेसोबत लोकप्रतिनिधींचीही मागणी पूर्ण

By नरेश डोंगरे | Updated: May 31, 2025 21:29 IST2025-05-31T21:16:24+5:302025-05-31T21:29:44+5:30

काय आहे रेल्वेमंत्र्यांच्या पत्रात ?

MP's praise; Railway Minister's praise! Wrote a letter Good news: Along with the public, the demand of the people's representatives has also been fulfilled | खासदाराची साद; रेल्वेमंत्र्यांची दाद ! पत्र लिहून दिली खुशखबर : जनतेसोबत लोकप्रतिनिधींचीही मागणी पूर्ण

खासदाराची साद; रेल्वेमंत्र्यांची दाद ! पत्र लिहून दिली खुशखबर : जनतेसोबत लोकप्रतिनिधींचीही मागणी पूर्ण

नरेश डोंगरे

नागपूर : लोकांच्या सुविधेसाठी एका खासदाराने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना साद घातली. त्याला दाद देत रेल्वेमंत्री वैष्णव यांनी संबंधित खासदाराला पत्र लिहून गुड न्यूज दिली. विशेष म्हणजे, मध्य प्रदेशातील खासदाराला रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या या 'गुड न्यूज'मुळे नागपूर विदर्भातील प्रवाशांनाही फायदा होणार आहे. प्रकरण आहे एका नव्या रेल्वेगाडीला सुरू करण्याचे !

बालाघाट (मध्य प्रदेश)च्या खासदार भारती पारधी यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी काही दिवसांपूर्वी चर्चा केली होती. बालाघाटवरून नागपूर, पुण्याला जाणाऱ्या, येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे बालाघाट-पुणे रेल्वे मार्गावर एक नवीन रेल्वेगाडी सुरू करण्याची मागणी यावेळी खा. पारधी यांनी केली होती. त्याला अनुसरून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खा. पारधी यांना २८ मे रोजी एक पत्र लिहिले. जनहितार्थ केलेल्या तुमच्या मागणीची दखल घेत रिवा-पुणे ही नवीन रेल्वेगाडी सुरू करण्याचा रेल्वे बोर्डाने निर्णय घेतल्याचे त्यात नमूद करून ही गाडी व्हाया बालाघाट जाणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.

'गुड न्यूज'चा फिल

२९ मे रोजी जारी केलेल्या रेल्वे बोर्डाच्या पत्र (सीसी -९३/ २०२५) नुसार, नवीन रीवा -पुणे साप्ताहिक एक्स्प्रेस गोंदिया, नागपूर, वर्धा, भुसावळ, मनमाड, कोपरगावमार्गे धावणार आहे. यासंबंधाने अधिकाऱ्यांकडून फारशी माहिती मिळू शकली नाही. मात्र, रेल्वेमंत्र्यांकडून पाठविण्यात आलेले हे पत्र आज रेल्वेच्या वर्तुळात चांगलेच व्हायरल झाले आहे. परिणामी, अनेकांना 'गुड न्यूज'चा फिल आला आहे.

नव्या गाडीचा वैदर्भीयांनाही फायदा

विशेष म्हणजे, या नवीन गाडीचा वैदर्भीय जनतेलाही फायदा होणार आहे. कारण, नागपूर-पुणे-नागपूर रेल्वे मार्गावर वर्षभर प्रवाशांची गर्दी असते. प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत या मार्गावर उपलब्ध असलेल्या रेल्वेगाड्यांची संख्या फारच कमी आहे. त्यामुळे नागपूर-पुणे मार्गावरच्या प्रत्येक रेल्वे गाडीत खच्चून गर्दी असते. आता रिवा पुणे ही नवीन रेल्वेगाडी नागपूरमार्गेच धावणार असल्याने वैदर्भीय प्रवाशांनाही त्याचा लाभ मिळणार आहे.

Web Title: MP's praise; Railway Minister's praise! Wrote a letter Good news: Along with the public, the demand of the people's representatives has also been fulfilled