आत्महत्या करणारे रामाणी यांनी अंडरवर्ल्ड-मीडियावर बनवला होता चित्रपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 11:28 PM2019-07-22T23:28:16+5:302019-07-22T23:30:13+5:30

चित्रपट बनविणे आणि अभिनयाच्या शौकामुळे विनोद रामाणी कर्जबाजारी झाले. रामाणीचे कुटुंब मूळचे जरीपटका येथील आहे. ते पाच भाऊ आहेत. तीन नागपुरात राहतात. एक दुबईमध्ये व दुसरा मुंबईत राहतो. नागपुरात राहणाऱ्या रितेशचे औषधाचे दुकान आहे तर मनोहरलाल कपड्याचा व्यवसाय करतात. रामाणीने अतिशय छोट्या प्रमाणात व्यवसाय सुरू केला होता. परंतु आपल्या व्यावसायिक कौशल्याने त्यांनी व्यवसाय वाढवला. त्यांनी औषध दुकानांचे चेन सिस्टिम सुरू केले होते.

The movie was made by Suicider Ramani on the underworld-media | आत्महत्या करणारे रामाणी यांनी अंडरवर्ल्ड-मीडियावर बनवला होता चित्रपट

आत्महत्या करणारे रामाणी यांनी अंडरवर्ल्ड-मीडियावर बनवला होता चित्रपट

Next
ठळक मुद्देअभिनयाचाही होता छंद : कॉफी विथ डी आपटला अन् रामाणी कर्जबाजारी झाले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चित्रपट बनविणे आणि अभिनयाच्या शौकामुळे विनोद रामाणी कर्जबाजारी झाले. रामाणीचे कुटुंब मूळचे जरीपटका येथील आहे. ते पाच भाऊ आहेत. तीन नागपुरात राहतात. एक दुबईमध्ये व दुसरा मुंबईत राहतो. नागपुरात राहणाऱ्या रितेशचे औषधाचे दुकान आहे तर मनोहरलाल कपड्याचा व्यवसाय करतात. रामाणीने अतिशय छोट्या प्रमाणात व्यवसाय सुरू केला होता. परंतु आपल्या व्यावसायिक कौशल्याने त्यांनी व्यवसाय वाढवला. त्यांनी औषध दुकानांचे चेन सिस्टिम सुरू केले होते.
रामाणी यांना अभिनयाचा शौक होता. त्यांनी सुरुवातीला दोन सिंधी चित्रपटात काम केले. त्यांच्या अभिनयाचे कुटुंबीय व मित्रांनी कौतुक केले. यामुळे उत्साहित होऊन त्यांनी चित्रपट निर्माण क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ‘कॉफी विथ डी’ नावाचा चित्रपट बनवला. या चित्रपटात कपिल शर्माच्या कॉमेडी शोमधील चर्चीत सुनील ग्रोवर मुख्य भूमिकेत होते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व मीडियावर केंद्रित या चित्रपटाचे प्रोड्युसर रामाणी होते. त्यांनी चित्रपटात अभिनयसुद्धा केला होता. परंतु हा चित्रपट पहिल्याच दिवशी अपयशी ठरला. यामुळे रामाणी यांचे कोट्यवधी रुपये बुडाले. त्यांनी चित्रपट बनविण्यासाठी सावकारांकडून २०१६ ते २०१७ या दरम्यान कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले होते. चित्रपटासोबतच रामाणीही बुडाले. यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती बिघडली. पैशासाठी सावकार सातत्याने दबाव टाकू लागल्याने रामाणी यांनी नशेचे इंजेक्शन घ्यायला सुरुवात केली. अलीकडे ते पत्नीशी विनाकारण भांडायचे. तिच्यावर घरून निघून जाण्यास दबाव टाकायचे. शनिवारीसुद्धा त्यांनी पत्नीशी वाद घातला. पत्नी जरीपटक्याला निघून गेल्यानंतर त्यांनी स्वत:ला इंजेक्शन लावले आणि गळफास घेतला.
यापूर्वीही केला होता प्रयत्न
मिळालेल्या माहितीनुसार, रामाणी यांनी यापूर्वीही चार ते पाचवेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. कुटुंबातील सदस्यांनी समजविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना राग यायचा. ते हिंसक व्हायचे. त्यामुळे कुटुंबाल लोकही त्यांच्याशी बोलताना सावधगिरी बाळगायचे. त्यांना एकटे सोडत नव्हते. परंतु रामाणी त्यांच्याशी वाद घालून त्यांना घरातून बाहेर जाण्यास भाग पाडायचे.
चित्रपट बनवून डेअरी व्यापारीही बुडाला
चित्रपट निर्माणामुळे बुडणारे रामाणी शहरतील दुसरे व्यापारी आहेत. यापूर्वी एक डेअरी व्यापारीसुद्धा कोट्यवधी रुपये गमावून बसले. क्रिकेट बुकी आणि सावकारांनी त्याच्या इतवारीतील दुकानावर कब्जाही केला होता. त्या व्यापाऱ्याने चित्रपटासाठी बँकेतूनही कर्ज घेतले होते. बोगस दस्तावेजावर कर्ज घेतल्याने व्यापारी कुटुंबावर सीबीआयने गुन्हा दाखल करून अटक केली होती.

Web Title: The movie was made by Suicider Ramani on the underworld-media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.