नागपुरात ट्रेलरच्या धडकेत ऑटोचालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 20:02 IST2020-05-23T19:59:45+5:302020-05-23T20:02:35+5:30
भरधाव ट्रेलरने धडक मारल्यामुळे ऑटोची मोडतोड होऊन चालकाचा मृत्यू झाला. तर ऑटोत बसलेला एक प्रवासी गंभीर जखमी झाला. शुक्रवारी सकाळी ७ च्या सुमारास हा अपघात घडला.

नागपुरात ट्रेलरच्या धडकेत ऑटोचालकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भरधाव ट्रेलरने धडक मारल्यामुळे ऑटोची मोडतोड होऊन चालकाचा मृत्यू झाला. तर ऑटोत बसलेला एक प्रवासी गंभीर जखमी झाला. शुक्रवारी सकाळी ७ च्या सुमारास हा अपघात घडला. रामू माकन सेलोकर (वय ३०, रा. चित्रशाला नगर, कळमना) असे मृताचे नाव आहे. तर चुंनीलाल जट्टू यादव (वय ३४, रा. विजयनगर, नागपूर) असे जखमीचे नाव आहे.
रामू सेलोकर यादवसोबत ऑटोने कामनानगर ते इतवारी रेल्वे स्टेशनकडे जात होता. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिखली चौकात अज्ञात ट्रेलरने शुक्रवारी सकाळी ७ च्या सुमारास आॅटोला जोरदार धडक मारली. त्यामुळे ऑटो उलटून चालक रामू सेलोकर मृत झाला. तर फिर्यादी यादव गंभीर जखमी झाला. यादव यांच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी आरोपी ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याचा शोध घेतला जात आहे.