शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

चाळीस दिवसाचे बाळ घेऊन आई गावाच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 1:07 PM

दुचाकीवर दोन्ही बाजूंना खच्चून बांधलेल्या सामान्यांच्या पिशव्या, अडीच आणि साडेचार वर्षांची दोन लहान मुले आणि पदरात अवघ्या चाळीस दिवसाचे कोवळे बाळ घेऊन आलेल्या एका थकल्याभागल्या कुटुंबाने सर्वांनाच सुन्न करून सोडले.

गोपालकृष्ण मांडवकरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुचाकीवर दोन्ही बाजूंना खच्चून बांधलेल्या सामान्यांच्या पिशव्या, अडीच आणि साडेचार वर्षांची दोन लहान मुले आणि पदरात अवघ्या चाळीस दिवसाचे कोवळे बाळ घेऊन आलेल्या एका थकल्याभागल्या कुटुंबाने सर्वांनाच सुन्न करून सोडले. विजयवाडा (आंध्र प्रदेश) ते गोरखपूर (उत्तर प्रदेश) अशा सतराशे किलोमीटर प्रवासाला दुचाकीवर निघालेल्या या कुटुंबाला पाहून सारेच हळहळले.सोमवारी १८ मेच्या रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडलेला हा प्रसंग! बुटीबोरी ते नागपूरदरम्यान जामठा गावाजवळ असलेल्या दीनबंधू संस्थेच्या मदत केंद्रावर एक बाईक थांबली. या बाईकवर सर्व बाजूंनी पिशव्या लटकलेल्या. सोबत सुमारे अडीच आणि साडेचार वर्षे वयाची दोन मुले व अवघ्या एक महिना दहा दिवसाच्या तान्हुल्याला घेऊन ही माता बाईकवरून उतरली. लांबच्या प्रवासाने सर्वांचीच अवघडलेली अवस्था आणि थकून गेलेली ती माउली बघून उपस्थितांचे हृदय हेलावले.दिलीपकुमार प्रजापती आणि त्याची पत्नी चंदा प्रजापती असे या जोडप्याचे नाव. सुतारकीचा व्यवसाय असल्याने दिलीपने गोरखपूर सोडले आणि काही वर्षापूर्वी आंध्र प्रदेशातील विजयवाडा गाठले. तेथे एका कंत्राटदाराकडे सुतारकीचा व्यवसाय सुरू केला. दोन मुले झाली. कष्टाच्या रोजीवर संसार सुखाचा सुरू होता. अशातच मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉकडाऊन झाले. पत्नी चंदा तिसऱ्यांदा गर्भवती होती. दिवस भरल्याने एप्रिल महिन्यात तिने बाळाला जन्म दिला. लॉकडाऊनमुळे हातचे काम सुटलेले. हाताला काम नसल्याने घरात पैसा नाही. कुटुंबात बाळाचा जन्म झालेला. पत्नीच्या बाळंतपणाचा आणि औषध पाण्यासाठी खर्च आ वासून उभा राहिलेला. अशातही त्याने बाहेर काम शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु घरमालकाने कोरोनाच्या भीतीने बाहेर काम करण्यास स्पष्ट नकार दिला. पैसा हातात नसल्याने घरभाडे देता आले नाही. घरमालकाने किरायाचा तगादा लावला. परका मुलूख, परकी माणसे! या कठीण दिवसात मदतीला तरी कोण येणार? शेवटी नाईलाजाने या जोडप्याने उत्तर प्रदेशातील गोरखपूरजवळच्या पादरी बाजार या आपल्या जन्मगावी जाण्याचा निर्णय घेतला. प्रवासासाठी त्यांनी रेल्वेचा पर्याय शोधून पहिला. परंतु तिकीट मिळाले नाही. कारण आधार कार्ड जवळ नव्हते. शेवटी त्यांनी निर्णय पक्का केला. बाईकवर गावाकडे जाण्याचे ठरवले. दोन लहान मुले, एक नवजात बाळ आणि पत्नीला सोबत घेऊन अख्ख्या बिºहाडासह तो बाईकवर गावाकडे निघालाय.बाळ गुंडाळले होते फाटक्या कपड्यातया कुटुंबाची आर्थिक परिस्थिती इतकी वाईट होती की चाळीस दिवसाच्या या बाळाला दुचाकीवरून प्रवासात नेण्यासाठी पुरेसे कपडेही नव्हते. घरीच असलेल्या साडीच्या एका फाटक्या कापडामध्ये या बाळाला गुंडाळून ही माउली आपल्या पदराआड सांभाळत होती. दोन लहान मुले आणि कुशीत बाळ घेऊन आयुष्याचा तोल सांभाळत निघालेल्या या माउलीची धडपड डोळ्यात पाणी आणणारी होती.अन् चंदाचे डोळे डबडबले!दीनबंधू या सामाजिक संस्थेकडून सुरू असलेल्या सेवार्थ अन्नछत्रावर हे कुटुंब पोहोचले असता तेथील स्वयंसेवकांनी या कुटुंबाला जेवण दिले. निघताना सोबत फळे, फराळ, बिस्किटे, ग्लुकोजही बांधून दिले. या ओल्या बाळंतिणीच्या हाती माहेरचे कर्तव्य समजून पैशाचे पॅकेट ठेवले. ही आपुलकी आणि प्रेम बघून चंदाचे डोळे डबडबून आले.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस