शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंट रस्त्यांसाठी एकापेक्षा अधिक कंत्राटदार

By admin | Updated: April 28, 2015 02:37 IST

१०० कोटी रुपयांचा सिमेंट रस्त्यांच्या प्रकल्पात बराच विलंब झाल्यानंतर महापालिकेने धडा घेतला आहे. आता ३००

‘डीपीआर’ महिनाभरात : ५१ रस्त्यांना मनपाची मंजुरीनागपूर : १०० कोटी रुपयांचा सिमेंट रस्त्यांच्या प्रकल्पात बराच विलंब झाल्यानंतर महापालिकेने धडा घेतला आहे. आता ३०० कोटी रुपयांचे सिमेंट रस्ते बांधण्यासाठी एकापेक्षा अधिक कंत्राटदार नियुक्त करण्याचा विचार महापालिका करीत आहे. एका कंत्राटदाराला झोननिहाय किंवा दोन-तीन रस्त्यांचेच काम दिले जाईल. एकाच वेळी जवळपास सर्वच रस्त्यांचे काम सुरू केले जाईल. यामुळे सिमेंट रस्त्यांची कामे लवकर पूर्ण होतील, अशी रणनीती महापालिकेने आखली आहे. सोमवारी महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत ५१ सिमेंट रस्त्यांची यादी मंजूर करण्यात आली. सोबतच या रस्त्यांचा डीपीआर (विस्तृत प्रकल्प अहवाल) महिनाभरात तयार करण्याचे निर्देश अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी प्रशासनाला दिले. संबंधित डीपीआर अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला जाईल. ३०० कोटी रुपये खर्च करून सुमारे ६७ कि.मी.चे रस्ते सिमेंटचे केले जातील. या प्रकल्पासाठी महापालिका, नासुप्र व राज्य सरकार प्रत्येकी १०० कोटी रुपये देणार असून संपूर्ण रस्ते महापालिकेमार्फत बांधले जातील. प्रकल्पासाठी विशेष सेल स्थापन करण्याचाही विचार सुरू असल्याचे सिंगारे यांनी स्पष्ट केले. यापूर्वी महापालिकेने १०० कोटी रुपयांचे सिमेंट रस्ते बांधण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. मात्र, संबंधित काम एकाच कंत्राटदाराला देण्यात आले होते. कंत्राटदाराने आडमुठी भूमिका घेतल्याने बरेच दिवस काम रखडले. यामुळे यावेळी वेगवेगळ्या कंत्राटदारांना कामे विभागून देण्याचा विचार सुरू असल्याचे सिंगारे यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पासाठी पीएमसी (प्रकल्प सल्लागार) नियुक्त करायचा की नाही हे अद्याप ठरलेले नाही, असेही त्यांनी सांगितले. नासुप्रला द्यावा लागेल निधीसिमेंट रस्त्यांसाठी आपल्या वाट्याचे १०० कोटी रुपये महापालिकेला न देता तेवढ्या निधीत स्वत:च रस्त्यांची कामे करण्याचा नासुप्रचा विचार असल्याची माहिती आहे. मात्र, सिंगारे यांनी तसे नसल्याचे स्पष्ट केले. या प्रकल्पाचा आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तयार केला आहे. त्यांनीच महापालिका प्रकल्पाची अंमलबजावणी करेल, असे निश्चित केले आहे. त्यामुळे नासुप्र महापालिकेला त्यांच्या वाट्याचा निधी देईल, असा विश्वास सिंगारे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात सर्वाधिक रस्ते ५१ सिमेंट रस्ते तयार होणार असले तरी यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असलेल्या दक्षिण-पश्चिम नागपुरातील सर्वाधिक १२ रस्त्यांचा समावेश आहे. इतर मतदारसंघातील ६ ते ९ रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. यावर रस्त्यांसाठी कोणत्या एका मतदारसंघाला नव्हे तर संपूर्ण शहराला प्राधान्य दिले असल्याचा दावा सिंगारे यांनी केला.