महिलांच्या तुलनेत पुरुषांवर कोरोनाचा अधिक प्रकोप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 10:05 PM2021-06-15T22:05:04+5:302021-06-15T22:05:33+5:30

corona death महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात या महिन्यात सात हजार ५५५ मृत्यूंची नोंद करण्यात आली. यात चार हजार ७०० पुरुष, तर दोन हजार ८५५ महिलांचा समावेश आहे. मृत्यूची आकडेवारी विचारात घेता महिलांच्या तुलनेत पुरुषांवर कोरोनाचा अधिक प्रकोप होता.

More corona death of men than women! | महिलांच्या तुलनेत पुरुषांवर कोरोनाचा अधिक प्रकोप !

महिलांच्या तुलनेत पुरुषांवर कोरोनाचा अधिक प्रकोप !

Next
ठळक मुद्देनागपुरात पाच महिन्यांत ९४३४ पुरुषांचा, तर ५८३० महिलांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ३० लाख लोकसंख्येच्या नागपूर शहरात दररोज नैसर्गिक व आजारामुळे सरासरी ७० ते ८० मृत्यू होतात; परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मार्च महिन्यात मृत्यूंची संख्या वाढण्याला सुरुवात झाली. एप्रिल महिन्यात कोरोना प्रकोपामुळे तब्बल नऊ हजारांहून अधिक मृत्यू झाले. परंतु महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात या महिन्यात सात हजार ५५५ मृत्यूंची नोंद करण्यात आली. यात चार हजार ७०० पुरुष, तर दोन हजार ८५५ महिलांचा समावेश आहे. मृत्यूची आकडेवारी विचारात घेता महिलांच्या तुलनेत पुरुषांवर कोरोनाचा अधिक प्रकोप होता.

महापालिकेच्या प्रशासनाकडून शहरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची आकडेवारी रोज जाहीर केली जाते; परंतु प्रशासनाकडून जाहीर करण्यात येणारे आकडे आणि शहरातील दहनघाटावर करण्यात आलेले अंत्यसंस्कार यांचा विचार करता, जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीच्या चौपट अंतिम संस्कार झाल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.

जानेवारी २०२१ मध्ये नागपूर शहरात २५३८ मृत्यूची नोंद करण्यात आली. यात पुरुष १५७५, तर ९६३ महिलांचा समावेश होता. फेब्रुवारी महिन्यात २३०४ मृत्यू झाले. यात १४०६ पुरुष, तर ८९८ महिलांचा समावेश होता. मार्च महिन्यात कोरोना संक्रमणामुळे मृत्यूचा आकडा वाढला. या महिन्यात २८६७ मृत्यू झाले. यात १७५३ पुरुष, तर १११४ महिलांचा समावेश होता. एप्रिल महिन्यात सर्वाधिक ७५५५ मृत्यूंची नोंद करण्यात आली.

एका दिवसात ४०० मृत्यू

नागपूर शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या आसपास आहे. शहरात रोज ७० ते ८० मृत्यू नैसर्गिक व आजारामुळे होतात; परंतु एप्रिल महिन्यात कोरोना संक्रमणामुळे मृतांचा आकडा हा ३०० ते ४०० पर्यंत पोहोचला होता. यामुळे प्रमुख घाटावर एकाच वेळी आठ ते दहाजणांवर अंत्यसंस्कार करावे लागत होते. ओटे खाली नसल्याने खालील जागेतही अंत्यसंस्कार करावे लागले, अशी भयानक परिस्थिती शहरातील घाटावर होती.

१५ दिवसांत चार हजारांहून अधिक अंतिम संस्कार

कोरोना प्रकोपामुळे शहरात दररोज २५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे एप्रिलच्या १५ दिवसांत चार हजारांहून अधिक मृत्यूची नोंद करण्यात आली. रुग्णालयांतील रुग्णांच्या मृत्यूसोबतच गृह विलगीकरणात असलेल्यांचाही समावेश होता; परंतु गृह विलगीकरणातील असलेल्यांची नोंद न केल्याने त्यांचा कोविड मृत्यूंत समावेश करण्यात आला नव्हता.

महिना             एकूण मृत्यू             पुरुष             महिला

जानेवारी -२०२१ २५३८             १५७५             ९६३

फेब्रुवारी             २३०४             १४०६             ८९८

मार्च             २८६७             १७५३             १११४

एप्रिल             ७५५५             ४७००             २८५५

एकूण             १५२६४             ९४३४                        ५८३०

Web Title: More corona death of men than women!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.