शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

सहा वर्षात राज्यात ५८ हजारांहून अधिक वीजचोरीची प्रकरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 11:42 PM

राज्यात विविध प्रकारे जागृती करूनदेखील वीजचोरीचे प्रमाण फारसे कमी झालेले नाही. २०१२ सालापासून सहा वर्षात राज्यात विविध ठिकाणी महावितरणतर्फे ५८ हजारांहून अधिक वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आणण्यात आली. यांची किंमत १२३ कोटींहून अधिक आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देमहावितरणकडून कारवाई : छाप्यांमध्ये १२३ कोटींची चोरी उघडकीस

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यात विविध प्रकारे जागृती करूनदेखील वीजचोरीचे प्रमाण फारसे कमी झालेले नाही. २०१२ सालापासून सहा वर्षात राज्यात विविध ठिकाणी महावितरणतर्फे ५८ हजारांहून अधिक वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आणण्यात आली. यांची किंमत १२३ कोटींहून अधिक आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडे विचारणा केली होती. एप्रिल २०१२ ते मार्च २०१८ या कालावधीत राज्यात वीजचोरीची किती प्रकरणे समोर आली, भरारी पथकांच्या छाप्यात किती रुपयाच्या वीजचोऱ्या उघडकीस आल्या, किती वीज चोºयांची माहिती खबºयांकडून प्राप्त झाली व खबºयांना किती रोख रक्कम देण्यात आली याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार एप्रिल २०१२ ते मार्च २०१८ या कालावधीत राज्यात वीजचोरीची ५८९३३ प्रकरणे आढळून आली. यातील सर्वात जास्त ११४०३ प्रकरणे २०१६-१७ मध्ये समोर आली. महावितरणच्या भरारी पथकाने मारलेल्या छाप्यांमध्ये या सहा वर्षांच्या कालावधीत १२३ कोटी ५ लाख ८४ हजार रुपयांच्या वीजचोºया उघडकीस आल्या.वर्षभरात ३९ कोटींच्या वीजचोरी उघडकीसमहावितरणने मागील काही काळापासून कारवाईचा वेग वाढविला आहे. २०१७-१८ या वर्षात ९९२० वीजचोरी उघडकीस आल्या. या चोरींचे मूल्य ३९ कोटी ८२ लाख २३ हजार रुपये इतके होते. २०१२ पासूनची ही वर्षभरातील सर्वात जास्त रक्कम ठरली.१० टक्के प्रकरणांची माहिती खबऱ्यांकडूनएप्रिल २०१२ ते मार्च २०१८ या कालावधीत खबऱ्यांकडून ६२३८ वीजचोरींची माहिती कळाली. या माहितीच्या आधारे महावितरणच्या भरारी पथकाने संबंधित ठिकाणी छापे मारले. खबऱ्यांना या माहितीसाठी ६४ लाख ६० हजार ६११ रुपयांची रोख रक्कम देण्यात आली.वर्षनिहाय वीजचोरीवर्ष           सापडलेल्या वीजचोरी             उघडकीस आलेल्या वीजचोरीची रक्कम (लाखांमध्ये)२०१२-१३        ८,२६१                                      १९४२.५१२०१३-१४       ८,३५७                                     १३०९.८२२०१४-१५       ९,९५६                                    १३९६.५२२०१५-१६       ११,०३६                                   १८१२.७२२०१६-१७       ११,४०३                                  १८६२.०४२०१७-१८        ९,९२०                                  ३९८२.२३

टॅग्स :electricityवीजtheftचोरी