नागपूर जिल्ह्यात ५०० हून अधिक पक्षांचा मृत्यू, बर्ड फ्लूचा धोका असल्याची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 15:35 IST2021-01-09T15:34:35+5:302021-01-09T15:35:41+5:30

Nagpur : काटोल तालुका पशुधन अधिकारी व कोंढाळीचे प्रभारी पशुधन विकास अधिकारी डॉ.तुषार पुंड  व सुधीर कापसीकर विविध गावांना भेट देवून या प्रकाराची माहिती घेत आहे.

More than 500 birds die in Nagpur district, bird flu threat | नागपूर जिल्ह्यात ५०० हून अधिक पक्षांचा मृत्यू, बर्ड फ्लूचा धोका असल्याची शक्यता 

नागपूर जिल्ह्यात ५०० हून अधिक पक्षांचा मृत्यू, बर्ड फ्लूचा धोका असल्याची शक्यता 

ठळक मुद्देपक्षांचा हा मृत्यू कोणत्या आजारामुळे झाला हे अद्याप जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले नाही.

नागपूर (कोंढाळी) : राज्याचा पशुसंवर्धन विभाग बर्ड फ्ल्यूचा धोका नसल्याचे सांगत असला तरी नागपूर नजीकच्या कोंढाळी भागातील रिंगणाबोडी, माणिकवाडा, मसाळा, शिवा, आकेवाडा आदी भागात ५०० हून अधिक चिमन्या, पोपट, कावळे आदी पक्षांचा मृत्यू झाला आहे.

पक्षांचा हा मृत्यू कोणत्या आजारामुळे झाला हे अद्याप जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले नाही. मात्र परिसरात उघडकीस आलेल्या या प्रकारामुळे स्थानिक पशुपालकात भितीचे वातावरण पसरले आहे. यासंदर्भात रिंगणाबोडी येथील पोलीस पाटील संजय नागपूरे यांनी कोंढाळीचे ठाणेदार विश्वास फुल्लरवार यांना माहिती दिली.

काटोल तालुका पशुधन अधिकारी व कोंढाळीचे प्रभारी पशुधन विकास अधिकारी डॉ.तुषार पुंड  व सुधीर कापसीकर विविध गावांना भेट देवून या प्रकाराची माहिती घेत आहे. पक्षांचा हा मृत्यू कशामुळे झाला हे वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट करण्यात येईल, असे पशुसंवर्धन विभागाच्या स्थानिक अधिका-यांनी सांगितले आहे.

Web Title: More than 500 birds die in Nagpur district, bird flu threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.