मारहाण करून रक्कम हिसकावून नेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:15 AM2021-02-21T04:15:09+5:302021-02-21T04:15:09+5:30

हिवसे बुधवारी रात्री घराकडे जात असताना दोन भामट्यांनी त्यांची दुचाकी अडवली. त्यांच्या खिशात हात घालून जबरीने ५०० रुपये काढून ...

The money was snatched by beating | मारहाण करून रक्कम हिसकावून नेली

मारहाण करून रक्कम हिसकावून नेली

Next

हिवसे बुधवारी रात्री घराकडे जात असताना दोन भामट्यांनी त्यांची दुचाकी अडवली. त्यांच्या खिशात हात घालून जबरीने ५०० रुपये काढून घेतले. हिवसे यांनी प्रतिकार केला असता आरोपींनी त्यांना खाली पाडून मारहाण केली. त्यानंतर डोक्यावर विट मारून गंभीर जखमी केले. आरडाओरड केल्यामुळे आरोपी पळून गेले. हिवसे यांनी अजनी पोलिसांना दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

-----

अजनीतील मुलगा बेपत्ता

नागपूर -अजनीतील जयभीमनगरात सुषमा अमित जोसेफ (वय ३६) यांचा १२ वर्षांचा मुलगा अरमान शुक्रवारी सकाळी ८.३० पासून बेपत्ता झाला. शोध घेऊनही तो सापडला नाही. त्यामुळे सुषमा यांनी अजनी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. बेपत्ता मुलाचा शोध घेतला जात आहे.

----

नोकरीच्या नावाने फसवणूक

नागपूर - एअरटेल कंपनीत नोकरी लावून देण्याची थाप मारून सोहेब खान शेरखान (वय २५) या तरुणाचे सायबर गुन्हेगाराने १ लाख, ९८ हजार रुपये हडपले.२५ ते २७ जानेवारीदरम्यान ही घटना घडली. नंदनवन पोलिसांनी या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

----

Web Title: The money was snatched by beating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.