नागपुरात वयोवृद्धाचे बालिकेशी चाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 11:59 IST2019-08-21T11:58:02+5:302019-08-21T11:59:19+5:30

बिस्किट दाखविण्याच्या बहाण्याने दुकानाच्या आत बोलवून एका म्हाताऱ्याने नऊ वर्षीय बालिकेशी चाळे केले.

Molestation of minor girl by old aged man in Nagpur | नागपुरात वयोवृद्धाचे बालिकेशी चाळे

छायाचित्र प्रतीकात्मक आहे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बिस्किट दाखविण्याच्या बहाण्याने दुकानाच्या आत बोलवून एका म्हाताऱ्याने नऊ वर्षीय बालिकेशी चाळे केले. या गुन्ह्यासंबंधाने आरडाओरड झाल्यानंतर तहसील पोलिसांनी विनयभंगाच्या आरोपाखाली मोहम्मद सुभान (वय ६५) याला अटक केली.
आरोपी सुभानचे तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत किराणा दुकान आहे. मुलीने तिच्या पालकांना सांगितलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी ४ वाजता पीडित बालिका सुभानच्या किराणा दुकानात दूध आणि बिस्किट घ्यायला गेली होती. तिला बिस्किट दाखविण्याच्या बहाण्याने आरोपीने आतमध्ये बोलविले आणि तिच्यासोबत अश्लील चाळे केले. मुलीने आरडाओरड करून घरी पळ काढला. तिची भेदरलेली अवस्था बघून पालकांनी तिला विचारणा केली असता तिने सुभानच्या कुकृत्याबाबत वाच्यता केली. तिच्या पालकांनी शेजाऱ्यांना सोबत घेऊन सुभानची खरडपट्टी काढली. त्यानंतर तहसील ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी मुलीची तक्रार नोंदवून घेत पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून सुभानला अटक केली. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.
 

Web Title: Molestation of minor girl by old aged man in Nagpur